Viral Video Dainik Gomantak
देश

Video: काटा लॉकच होणार होता... पण झेब्रा शेवटच्या क्षणापर्यंत लढला, नेमकं काय झालं? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Crocodile Vs Zebra Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक झेब्रा मगरीच्या जबड्यातून आपला जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

Manish Jadhav

Crocodile Vs Zebra Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक झेब्रा मगरीच्या जबड्यातून आपला जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. झेब्य्राने शेवटच्या श्वासापर्यंत हार मानली नाही. अखेर मगरीच्या कचाट्यातून त्याने आपली सुटका करुनच दाखवली.

आधी हा व्हिडिओ पाहा!

झेब्रा लढला

दरम्यान, व्हिडिओची सुरुवात एक झेब्रा नदी ओलांडण्याचा प्रयत्न करताना होते. त्याचवेळी, मगरींचा एक समूह सर्व शक्तीनिशी त्याच्यावर हल्ला करतो. एका मगरीने झेब्राला पकडले. त्यानंतर वाटले की, आता खेळ संपला... पण झेब्राने हार मानली नाही. त्याने केवळ धाडसच दाखवले नाही तर अशी युक्तीही केली की मगरीही विचारात पडल्या. या लढाईत झेब्राने एका मगरीला जोराचा चावा घेतला. त्यानंतर मोठ्या धाडसाने झेब्राने मगरीच्या कचाट्यातून बाहेर पडत आपला जीव वाचवला.

दुसरीकडे, हा व्हिडिओ @Nature is Amazing नावाच्या अकाउंटवरुन X या सोशल साइटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1.5 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले की, "त्या झेब्य्राने मगरीला चावा घेऊन आपला जीव वाचवला. अनेक यूजर्संनी व्हिडिओवर कमेंटही केली. एकाने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, "हा झेब्रा खरा गुंडा आहे, त्याने मगरीलाही धडा शिकवला!" तर दुसऱ्याने लिहिले की, "जेव्हा जीव धोक्यात असतो तेव्हा झेब्रासारखे लढावे लागते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात... युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT