Crime  Dainik Gomantak
देश

चाकूने भोसकून तरुणाची हत्या

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर-पूर्व दिल्लीतील हर्ष विहार भागात सोमवारी संध्याकाळी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. मित्राशी झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी चार-पाच मुलांनी तरुणावर हल्ला केला.

हल्ल्यानंतर तरुणाला जीटीबी रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले होते. तिथेच त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांव्यतिरिक्त गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंटू हा आपल्या कुटुंबासह (Family) गल्ली क्रमांक-8, प्रताप नगर, साबोली येथे राहत होता. त्यांच्या पश्चात वडील अनिल कुमार, आई, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. चिंटू खासगी नोकरी करायचा. त्याचे आई-वडील दोघेही कारखान्यात काम करतात. त्याचे दोन्ही भाऊ कुटुंबापासून वेगळे राहतात.

सोमवारी दुपारी चारच्या सुमारास चिंटू हा त्याचा मित्र आशिषसोबत बाहेर जात होता. दरम्यान चार-पाच मुले त्याच्या मित्राशी भांडू लागली. चिंटूने विरोध केला असता त्याला धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेले. काही वेळाने आरोपींनी पुन्हा दोघांना घेरले. दरम्यान, आरोपींनी आशिषला मारहाण करण्यास सुरुवात केली. चिंटूने विरोध केला असता आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. चिंटूला चार ते पाच वार करून ते फरार झाले. आरोपींची ओळख पटली असल्याचे पोलिस (Police) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT