आणखी एका इलेक्ट्रिक स्कूटरने घेतला पेट

इलेक्ट्रिक स्कूटर दुकानाबाहेर केली होती पार्क
auto news story another electric scooter caught fire incident at manapparai after pune ola scooter tutk
auto news story another electric scooter caught fire incident at manapparai after pune ola scooter tutk Dainik Gomantak
Published on
Updated on

इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. महाराष्ट्रातील पुणे आणि तामिळनाडूमधील वेल्लोरनंतर आता नवीन घटना तामिळनाडूतील मन्नपराईची आहे.

सिंगापूरमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे मुरुगेसन हे सुट्टीवर आपल्या घरी आले होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. ही इलेक्ट्रिक स्कूटर ओकिनावा कंपनीची असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंगापूरला परतण्यापूर्वी 27 मार्च रोजी आपली इलेक्ट्रिक स्कूटर मित्राच्या दुकानाबाहेर पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र बाळू याने दुकान उघडले असता इलेक्ट्रिक स्कूटरमधून धूर निघताना दिसला.

यानंतर इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतला. आजूबाजूला पाणी नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने पाणी व मिनरल वॉटर टाकून आग विझवण्यात आली.

auto news story another electric scooter caught fire incident at manapparai after pune ola scooter tutk
'ही' 8 महत्त्वाची कामे 31 मार्चपर्यंत करा पूर्ण, अन्यथा भरावा लागेल दंड

पुण्यात स्कूटरला आग

याआधी शनिवारी महाराष्ट्रातील पुण्यातील धानोरी परिसरात स्कूटरला अचानक आग (Fire) लागल्याची घटना घडली. या घटनेत इलेक्ट्रिक स्कूटर रस्त्यावर जळू लागली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सरकारने या घटनेची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचवेळी वेल्लोरमध्येही काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक (Electric) स्कूटरच्या चार्जिंगदरम्यान तिच्या बॅटरीचा स्फोट झाला होता. यामध्ये वडील आणि मुलीचा मृत्यू (death) झाला होता. मात्र, या घटनेच्या तपासात त्याने वाहन चार्ज करण्यासाठी चार्जर जुन्या सॉकेटमध्ये ठेवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन बॅटरीचा स्फोट झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com