Delhi Crime Dainik Gomantak
देश

Delhi Crime: दिल्लीत पुन्हा निर्भया, हैवानाने 3 अल्पवयीन मुलींना बनवले वासनेचे शिकार

Delhi Crime News: दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Crime: दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. एका हैवानने तीन विद्यार्थिनींवर बलात्कार केला. आरोपीने आधी तिघींना दारु पाजली, नंतर त्यांना नशेच्या गोळ्या देऊन क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. या पीडित मुलींना चंदीगडला विकण्यासाठी घेऊन जाण्यात येणार होते, असेही आता समोर आले आहे. या धक्कादायक घटनेनंतर दोन महिलांची भूमिकाही समोर आली आहे. ज्यांनी या हैवानाला या संपूर्ण प्रकरणात मदत केली आहे.

दरम्यान, आरोपीने (Accused) दहावीत शिकत असणाऱ्या तीन विद्यार्थिनींना नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून बेगमपूर, रोहिणी इथे नेऊन बलात्कार केला. मुलींना दारु पाजल्यानंतर आळीपाळीने त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थिनींना लग्नाच्या बहाण्याने चंदीगडला विकण्यासाठी नेले जात होते. याचदरम्यान मुली आरोपीच्या तावडीतून कशाबशा सुटल्या आणि त्यांनी थेट करोलबाग गाठले. दुसरीकडे, डिफेन्स कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ज्योती आणि रुक्साना आणि बंगाली लाल शर्मा आणि संदीप उर्फ ​​सेनकी नावाच्या दोन महिलांना अटक केली आहे. मुख्य आरोपी प्रकाश उर्फ ​​संजय उर्फ ​​मिंटू याच्या अटकेसाठी दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi-NCR) छापे टाकण्यात येत आहेत.

दक्षिण जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विद्यार्थीनी (Students) गोविंदपुरी (15), दुसरी ग्रेटर कैलास (15) आणि तिसरी चिराग दिल्ली (14) येथील आहेत. विशेष म्हणजे, या तिघीही डिफेन्स कॉलनी येथील सरकारी शाळेत दहावीत शिकत होत्या. दुसरीकडे, या मुलींनी 6 ऑगस्ट रोजी मुंबईला जाण्यासाठी शाळेला रामराम ठोकला. मुंबईला जाण्यासाठी त्यांनी थेट नवी दिल्ली रेल्वे स्थानक गाठले. इथे त्यांच्या संपर्कात प्रकाश नावाचा आरोपी आला. त्यांनी प्रकाशला मुंबईला जाण्यासाठी ट्रेनच्या तिकीटाची मागणी केली. त्यावर त्याने सांगितले की, आज मुंबईसाठी एकही ट्रेन नाही. मात्र उद्या मुंबईला जाण्यासाठी ट्रेन आहे. विद्यार्थिनींना दुसऱ्या दिवसांपर्यंत ओयो हॉटेलमध्ये राहण्यास सांगितल्यावर आरोपीने मुलींना तिथून बहाण्याने बेगमपूरला नेले.

दुसरीकडे, ज्योती, रुक्साना, बंगाली लाल शर्मा आणि संदीप घरात आधीच हजर होते. याठिकाणी विद्यार्थिनींना जबरदस्तीने दारु पाजण्यात आली. त्यानंतर त्यांना नशेच्या गोळ्या देण्यात आल्या. यानंतर आरोपी प्रकाश याने नशेच्या अवस्थेत तीन विद्यार्थिनींवर आळीपाळीने बलात्कार केला. 8 ऑगस्ट रोजी विद्यार्थिनींना चंदीगडला नेण्याचे आश्वासन देऊन लग्नाच्या बहाण्याने तो घरातून निघून गेला. प्रत्यक्षात तो विद्यार्थिनींना चंदीगडला विकण्यासाठी घेऊन जाणार होता. परंतु आरोपीचा कावा लक्षात आल्यानंतर पीडित मुलींनी थेट करोलबाग गाठले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी यापूर्वीच अपहरणाचा एफआयआर दाखल केला होता

विद्यार्थिनी शाळेतून घरी न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस विद्यार्थिनींचा शोध घेत होते. आता डिफेन्स कॉलनी पोलिस स्टेशनने एफआयआरमध्ये बलात्कार, पॉक्सो आणि मानवी तस्करी इत्यादी कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT