bengal cricketer priyajit ghosh dies Dainik Gomantak
देश

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 22 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; जिममध्ये आला हृदयविकाराचा झटका आला

bengal cricketer priyajit ghosh dies; क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी आली आहे. बंगालचा उदयोन्मुख क्रिकेटपटू प्रियजित घोष याचे शुक्रवारी (२ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Sameer Amunekar

क्रिकेट जगतातून एक दुःखद बातमी आली आहे. बंगालचा उदयोन्मुख क्रिकेटपटू प्रियजित घोष याचे शुक्रवारी (२ ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रियजित घोष फक्त २२ वर्षांचा होता. शुक्रवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना प्रियजितला हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या अकाली निधनामुळे मित्र, कुटुंब आणि संघातील खेळाडूंमध्ये शोककळा पसरली आहे.

प्रियजित घोष हा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथील रहिवासी होते. त्याचे स्वप्न होते की प्रथम बंगालच्या रणजी संघात स्थान मिळवावे, नंतर त्यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून एक दिवस भारतीय संघात खेळायचे होते. क्रिकेट त्यांच्यासाठी फक्त एक खेळ नव्हता, तर तो त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनला होता.

प्रियजित घोषचा क्रिकेट प्रवास जिल्हा पातळीवरून सुरू झाला. २०१८-१९ च्या हंगामात, प्रियजित घोष हा आंतर जिल्हा अंडर-१६ क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) ने ती स्पर्धा आयोजित केली होती. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला CAB ने सन्मानितही केले.

प्रियजित घोष बोलपूरच्या मिशन कंपाऊंड परिसरातील जिममध्ये गेला होते. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीप्रमाणे फिटनेसबाबत गंभीर असलेले प्रियजित जिममध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रियजितच्या निधनाने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thivim Railway Accident: थिवीत रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू, कोकण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरु; अपघाताचे गूढ कायम?

Goa Rain: हाय सायबा! दिवाळीपर्यंत पाऊस करणार मुक्काम; 2 दिवसांसाठी राज्यात 'Yellow Alert'

Goa Tourism: टॅक्सी, लॉजिंग, सीफूड झाले स्वस्त! GST कमी झाल्याने गोव्यात खिशाला परवडणाऱ्या पैशात करता येणार पर्यटन

Narkasur in Goa: संपूर्ण भारतापेक्षा गोव्याची दिवाळी असते खास! राक्षस वधाने होते पहाट, कुठे पाहाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Taj Mahal Fire Video: प्रसिद्ध ताजमहालच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराजवळ लागली आग, शॉर्ट सर्किटमुळं घडली घटना; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT