PM Narendra Modi  Dainik Gomantak
देश

'आज तुम्ही जिवंत असाल तर ती मोदींची देण...', बिहारच्या मंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य

पाकिस्तानची अवस्था तुम्ही टीव्हीवर पाहिलीच असेल. तरीही तुम्ही भारतात शांततेने जगत आहात- रामसूरत राय

दैनिक गोमन्तक

आज तुम्ही सर्वजण जिवंत असाल तर ती नरेंद्र मोदींची देण आहे, असे धक्कादायक वक्तव्य नितीश कुमार सरकारमधील महसूल मंत्री रामसुरत राय यांनी केले आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील औरई विधानसभा मतदारसंघात दोन दिवसांच्या मुक्कामाच्या कार्यक्रमादरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. रामसूरत राय हे भाजपचे आमदार आहेत. ते पुढे म्हणाले की, 'कोरोना काळात देशांची स्थिती वाईट होती, तुम्ही टीव्हीवर पाकिस्तानची स्थिती पाहिली असेल.'

दरम्यान, मंत्र्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ते असे म्हणताना दिसत आहेत की, 'आज तुम्ही जिवंत आहात तर ते फक्त नरेंद्र मोदींमुळेच. मोदींनी कोरोना लसीचा शोध लावला नसता, मोफत लस दिली नसती, तर क्वचितच कोणी जिवंत राहिले असते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र यांचा मृत्यू झाला.'

त्याचवेळी ते पुढे म्हणाले, 'विकासाची कामे होत आहेत, विकास झाला पाहिजे. मी तुम्हाला खात्री देतो. व्यवस्थेतर्गंत सरकार चालते. अगोदर आपल्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करा, आणि त्यानंतर उरलेल्या पैशातून विकास करुया. 2-3 वर्षात कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे बारा वाजले. अनेक देशांमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पाकिस्तानची अवस्था तुम्ही टीव्हीवर पाहिलीच असेल. तरीही तुम्ही भारतात शांततेने जगत आहात.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT