WBSSC: 'शिक्षक भरती घोटाळ्यात ममता बॅनर्जीही...', भाजप नेत्याचा गंभीर आरोप

WBSSC Recruitment Scam: पश्चिम बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशन (WBSSC) भरती घोटाळ्याचा वाद अधिकच गडद होत चालला आहे.
CM Mamata Banerjee
CM Mamata Banerjee Dainik Gomantak
Published on
Updated on

WBSSC Recruitment Scam: पश्चिम बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशन (WBSSC) भरती घोटाळ्याचा वाद अधिकच गडद होत चालला आहे. या घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी व्यतिरिक्त राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसीचे राष्ट्रीय सचिव अभिषेक बॅनर्जी यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, बंगालमध्ये भाजपचे उपाध्यक्ष सौमित्र खान यांनी म्हटले आहे की, 'ममता बॅनर्जी या मुख्य दोषी आहेत. पार्थ चॅटर्जी मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे 8 ते 10 तास घालवत असत. एसएससी घोटाळा मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच झाला आहे. मात्र आता ममता बॅनर्जी स्वतःला आणि आपल्या पुतण्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.'

CM Mamata Banerjee
Bengal SSC Scam: ममता बॅनर्जींची मोठी कारवाई, पार्थ चॅटर्जींची मंत्रीपदावरून हकालपट्टी

ममता यांच्यावर भाजपचा गंभीर आरोप

'ईडीने मुख्यमंत्र्यांच्या बँक खात्यांचीही चौकशी करावी,' असे ते पुढे म्हणाले. 'या घोटाळ्यातील पैसा ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना पाठवण्यात आले आहे. त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, हे मोठे षडयंत्र आहे,' असेही खान म्हणाले.

दुसरीकडे, भाजपचे (BJP) राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी दावा केला की, 'ममता बॅनर्जींना या घोटाळ्याची माहिती असू शकत नाही? पार्थ चॅटर्जी यांच्या घरात एवढा पैसा कुठून आला हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसावे, असे होऊच शकत नाही. त्या एक निरंकुश नेत्या आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय पक्षात श्वासही घेता येत नाही. हायकमांडच्या परवानगीशिवाय पार्थ चॅटर्जी काहीही करु शकत नाही.'

CM Mamata Banerjee
SSC Scam: पार्थ चॅटर्जींची हकालपट्टी केल्यानंतर ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया

पार्थ यांना सर्वपक्षीय पदावरुन निलंबित करण्यात आले

ते पुढे म्हणाले की, 'पार्थ चॅटर्जी कोणाच्या संमतीने हा पैसा गोळा करत होते, हेही भविष्यात कळेल. कदाचित तृणमूल काँग्रेसला (TMC) पार्थ यांनी कोणाचेही नाव घेऊ नये, अशी भीती वाटत असल्याने त्यांना सर्वपक्षीय पदांवरुन निलंबित करण्यात आले आहे. ED पश्चिम बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशन (WBSSC) आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळ (WBBPE) मधील भरती घोटाळ्याची चौकशी करत आहे. हा घोटाळा झाला तेव्हा चटर्जी पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री होते. ईडी या घोटाळ्यात कथितरित्या सहभागी असलेल्यांच्या मनी लाँड्रिंग पैलूची चौकशी करत आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com