Yogi adityanath Dainik Gomantak
देश

योगींच्या शपथविधी सोहळ्याला 'द काश्मीर फाइल्स' ची टीम लावणार हजेरी

दैनिक गोमन्तक

Yogi adityanath swearing in Ceremony: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या शपथविधीला भव्य स्वरूप देण्यासाठी भाजपकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजप प्रमुख जेपी नड्डा (JP Nadda) यांच्यासह अनेक दिग्गज नेते, उद्योगपतींसह हजारो पाहुणे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपचे विद्यमान आणि माजी मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बॉलीवूड स्टार अक्षय कुमार, कंगना रणावत (Kangana Ranavat) आणि बोनी कपूर यांनाही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाच्या टीमलाही या सोहळ्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अभिनेता अनुपम खेर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Yogi Adityanath's swearing in The Kashmir Files team has been invited)

दरम्यान, 25 मार्च रोजी दुपारी 4 वाजता भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर शपथविधी सोहळा होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामनेही याच स्टेडियममध्ये आयोजित केले जाणार आहेत. मुख्य मंचावर लावल्या जाणाऱ्या मोठ्या बॅनरमध्ये पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय जेपी नड्डा, अमित शाह आणि राजनाथ सिंह असतील. मैदानावर 20 हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर यूपीसह भारतभरातून भाजपचे कार्यकर्ते येणार आहेत.

तसेच, यूपीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत आले आहे. योगी हे 37 वर्षातील पहिले मुख्यमंत्री असतील जे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक टर्म पूर्ण करुन पुन्हा सत्तेवर येतील. राज्यात 41.29 टक्के मते मिळवून भाजप पुन्हा सत्तेत आला. विधानसभा निवडणुकीच्या अंदाजानुसार सत्ताधारी भाजप आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षामध्ये कडवी लढत असल्याचे मानले जात होते. मात्र, निकाल जाहीर झाल्यावर सपा भाजपपेक्षा खूपच मागे पडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT