Yogi Adityanath  Dainik Gomantak
देश

योगी सरकार 2.0: योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय एकना क्रिकेट स्टेडियमवर एक भव्य शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, भाजप शासित राज्यांचे बहुतांश मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्यातील जनतेनेही या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यानंतर केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी यूपीच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (Yogi Adityanath was sworn in as Chief Minister for the second time)

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांची गुरुवारी भाजपच्या नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि निरीक्षक म्हणून आलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या उपस्थितीत योगी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यासंबंधी प्रस्ताव मांडण्यात आला, त्यावर सर्व आमदारांनी सहमती दर्शवली.

तसेच, नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला 255 जागा मिळाल्या, तर त्यांचा मित्रपक्ष अपना दल सोनेलालला 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या. पूर्ण बहुमताचे सरकार बनवणार असल्याचा विश्वास योगींनी व्यक्त केला होता. 37 वर्षांपूर्वी, 1985 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण दत्त तिवारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले होते. तिवारी यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. योगी आदित्यनाथ यांच्या खात्यात तब्बल 37 वर्षांनंतर हा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT