Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath  Dainik Gomantak
देश

योगींची मोठी घोषणा; माफियांच्या जमीनींवर गरीबांसाठी घरं

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान ही घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी गुरुवारी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) मोठी घोषणा केली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेच्या प्रस्तावावर भाषण करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभेत म्हणाले की, राज्य सरकारने ताब्यात घेतलेल्या माफियांच्या सर्व जमिनींवर गरिबांसाठी घरे बनवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यां लोकांना स्मार्ट फोनही दिले जातील.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाला संबोधित करताना सांगितले की, आम्ही जप्त केलेल्या माफियांच्या सर्व जमिनीवर राज्यातील, गरिबांसाठी घरे बांधली जातील. आमच्या सरकारने 1500 कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जप्त केली आहे. आता आम्ही यावर गृहनिर्माण योजना आखत आहोत. ज्या योजनेअंतर्गत माफियांनी ज्या जमीनींवर कब्जा करून त्यांचे वाडे बांधले होते, ते पाडले जातील आणि गरिबांसाठी घरे बांधली जातील.

आमच्या सरकारने माफिया आणि गुन्हेगारांना सांभाळले नाही आणि आम्ही तसे करणारही नाही. सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘जो माफियाला सोबत घेऊन जाईल त्याला माहित आहे की, बुलडोझरही त्याट्या मागे -मागे जाईल. परिस्थिती आता बदलली आहे.'

पुढे बोलताना त्यांनी असेही सांगितले की, आमच्या सरकारमध्ये 1500 कोटींची बेकायदेशीर मालमत्ता केवळ जप्त करण्यात आली नाही तर त्या जमीनीवरील बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. आता राज्याच्या ताब्यात असलेली ही संपत्ती या गरीब लोकांची आहे आणि आम्ही त्यावर गृहनिर्माण योजना राबवत आहोत.

योगी आदियनाथ म्हणाले, सरकारला विश्वास आहे की, प्रत्येकाला समाजात कायदेशीर अधिकार मिळाले आहेत. मात्र असे काही लोक आहेत जे स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात. अशा लोकांचे डोळे गरीबांच्या जमिनीवर असायचे, ते संधी मिळताच जमिनीवर कब्जा करायचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT