BS Yeddyurappa Dainik Gomantak
देश

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या 30 वर्षीय नातीने केली आत्महत्या

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांची नात सौंदर्या हिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती 30 वर्षांची होती.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती 30 वर्षांची होती. सध्या बोअरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरु आहे. बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. सौंदर्या बंगळुरुच्या (Bangalore) एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती पती आणि सहा महिन्यांच्या बाळासोबत शहरातील माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. (Yeddyurappa 30 year old grandson commits suicide)

दरम्यान, दोन वर्षांपूर्वीच सौंदर्याचे लग्न झाले होते. शुक्रवारी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरिंग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बंगळुरुच्या हाय ग्राउंड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. सौंदर्या ही येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची मुलगी होती. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे कुटुंबीय आणि प्रदेश भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे दिग्गज नेते येडियुरप्पा यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief Minister Basavaraj Bommai) आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह रुग्णालयात पोहोचले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसते.

2018 मध्ये लग्न झाले

डॉ सौंदर्या वी वाई हिने शुक्रवारी सकाळी तिच्या वसंत नगर फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.सौंदर्याने हे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सौंदर्याने 2018 मध्ये डॉ नीरज एस यांच्याशी लग्न केले. दोघेही एकाच रुग्णालयात काम करत होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आठ वाजता नीरज हॉस्पिटलला गेले. नीरज कामावर निघून गेल्याच्या दोन तासांनी सौंदर्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची भीती व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री आणि मंत्री कुटुंबीयांपर्यंत पोहोचले

घरातील मोलकरणीने वारंवार येऊन दरवाजा ठोठावल्यानंतरही काही उपयोग झाला नाही, तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यांनी डॉ.नीरज यांना माहिती दिली. यानंतर नीरजनेही सौंदर्याला फोन केला होता. मात्र तेथूनही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर अपार्टमेंटचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मृतदेह बोरिंग रुग्णालयात नेण्यात आला, तिथे पोस्टमार्टम करण्यात येत आहे. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काही मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ अधिकारी येडियुरप्पा यांच्या घरी पोहोचले आणि शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT