Wrestlers Protest Dainik Gomantak
देश

Wrestlers Protest: आता तोडगा निघणार? कुस्तीपटूंनी घेतली अमित शाहंची भेट; अनेक मुद्यावर झाला खल

या बैठकीत काय घडले याबाबत सरकार किंवा पैलवानांकडून काहीही सांगण्यात आलेले नाही.

Puja Bonkile

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सुरु असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.

मात्र, या बैठकीत काय घडले याबाबत सरकार किंवा पैलवानांकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, ही बैठक अशावेळी झाली, जेव्हा कुस्तीपटूंनी सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी 5 दिवसांची मुदत दिली होती.

दरम्यान, शाह (Amit Shah) आणि पैलवानांमध्ये शनिवारी झालेली बैठक रात्री उशिरा दोन तासांहून अधिक काळ चालल्याचे वृत्त आहे. यामध्ये कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि काही प्रशिक्षकांचा सहभाग होता. याशिवाय, स्टार कुस्तीपटू विनेश फोगटही या निषेधार्थ आवाज उठवताना दिसली. सरकार कारवाईत दिरंगाई करत असल्याचा आरोपही कुस्तीपटूंनी केला आहे.

  • बैठकीत काय झालं

दुसरीकडे, 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंच्या तक्रारीवरुन सिंह यांच्याविरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत. शाह यांच्या भेटीत पैलवानांनी तपासात दिरंगाईचा मुद्दाही उपस्थित केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही कुस्तीपटूंना तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच, 27 मे रोजी म्हणजे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी पैलवान आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. त्यादरम्यान कोणताही निकाल न लागल्याने पैलवान समर्थकांसह नवीन संसदेकडे रवाना झाले. मात्र, त्यादरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले आणि अनेक पैलवानांना ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT