WPL MI vs RCB Dainik Gomantak
देश

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

WPL 2025 MI VS RCB: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून, महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या चौथ्या हंगामाचा बिगुल वाजला आहे.

Sameer Amunekar

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून, महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ च्या चौथ्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेचा सलामीचा सामना उद्या, ९ जानेवारी रोजी गतविजेता मुंबई इंडियन्स (MI) आणि २०२४ चा विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात रंगणार आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्याने मेगा इव्हेंटची दिमाखदार सुरुवात होईल.

सामन्याची वेळ आणि टॉस

मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील हा सलामीचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. या महत्त्वाच्या लढतीसाठी दोन्ही संघांचे कर्णधार संध्याकाळी ७:०० वाजता टॉससाठी मैदानावर येतील. दोन्ही संघ या विजयाने स्पर्धेची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

थेट प्रक्षेपण कोठे पाहाल?

हा रोमांचक सामना चाहत्यांना टीव्हीवर 'स्टार स्पोर्ट्स नेटवर्क'च्या (Star Sports Network) विविध चॅनेलवर पाहता येईल. तसेच, ज्या प्रेक्षकांना मोबाईलवर सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी 'जियो हॉटस्टार' (JioHotstar) ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) उपलब्ध असेल.

आमनेसामने: कोणाचे पारडे जड?

आतापर्यंत डब्ल्यूपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण ७ सामने खेळले गेले आहेत. या आकडेवारीमध्ये मुंबईचे पारडे किंचित जड असून त्यांनी ४ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर आरसीबीने ३ सामन्यांत बाजी मारली आहे. यंदाच्या ८ व्या सामन्यात कोण वरचढ ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण हंगामात एकूण ६ संघ सहभागी असून ५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २२ सामने खेळवले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT