World Cup 2025 Ind vs Pak Dainik Gomantak
देश

Ind vs Pak: मैदानावर 'हाय-व्होल्टेज' ड्रामा, पाकिस्तानी गोलंदाजानं डोळं वटारुन पाहिलं; पण धाकड हरमननंही दिलं चोख प्रत्युत्तर Watch Video

World Cup 2025 Ind vs Pak: कोलंबो येथे सुरू असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना रंगला आहे.

Sameer Amunekar

कोलंबो येथे सुरू असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना रंगला आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने ५० षटकांत २४७ धावा करत सर्वबाद झाला. विशेष म्हणजे, एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारत पहिल्यांदाच सर्वबाद झाला आहे. आता विजयासाठी पाकिस्तानला २४८ धावांचे आव्हान आहे.

भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या, तर शेवटच्या षटकांत ऋचा घोषने २० चेंडूत नाबाद ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

सामन्यातील एक क्षण मात्र सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. पाकिस्तानची गोलंदाज नशरा संधूने गोलंदाजीदरम्यान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरकडे डोळे वटारून पाहिलं. त्यावर हरमननेही तितक्याच धाकडपणे तिला प्रत्युत्तर दिलं. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

नाणेफेक गमावून फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली. ओपनर प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मानधना ३२ चेंडूत २३ धावा करून बाद झाली. प्रतिका रावलने ३७ चेंडूत ३१ धावा करत संघाला मजबूत सुरुवात दिली.

यानंतर हरलीन देओल आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी स्थिर भागीदारी केली. मात्र, हरमन ३४ चेंडूत १९ धावांवर बाद झाली. हरलीन देओलने ६५ चेंडूत ४६ धावा केल्या, ज्यामध्ये चार चौकार आणि एक षटकार होता. जेमिमा रॉड्रिग्जने ३७ चेंडूत ३२, दीप्ती शर्माने ३३ चेंडूत २५ आणि स्नेह राणाने २० धावा केल्या. शेवटी ऋचा घोषच्या जलद फटकेबाजीमुळे भारताचा डाव २४७ धावांवर संपला.

यानंतर हरलीन देओल आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी स्थिर भागीदारी केली. मात्र, हरमन ३४ चेंडूत १९ धावांवर बाद झाली. हरलीन देओलने ६५ चेंडूत ४६ धावा केल्या, ज्यामध्ये चार चौकार आणि एक षटकार होता. जेमिमा रॉड्रिग्जने ३७ चेंडूत ३२, दीप्ती शर्माने ३३ चेंडूत २५ आणि स्नेह राणाने २० धावा केल्या. शेवटी ऋचा घोषच्या जलद फटकेबाजीमुळे भारताचा डाव २४७ धावांवर संपला.

पाकिस्तानी गोलंदाजी

पाकिस्तानकडून डायना बेग सर्वात यशस्वी ठरली, तिने चार विकेट घेतल्या. सादिया इक्बाल आणि कर्णधार फातिमा सना यांनी प्रत्येकी दोन, तर नशरा संधू आणि रमीन शमीम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आता पाकिस्तानसमोर २४८ धावांचे लक्ष्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

Renuka Devi History: देव-असुरांमध्ये युद्ध चालू होते, श्रीविष्णूंनी वचन दिले की आदितीच्या गर्भातून जन्म घेतील; रेणुका मातेचा इतिहास

SCROLL FOR NEXT