Bus Accident 
देश

Bus Accident: दिवाळीनिमित्त गोव्यातून नेपाळला जाणाऱ्या बसचा अपघात, लहान बाळासह आठ प्रवासी जखमी

Bus Accident: बसमध्ये ४० प्रवासी होते. बस उलटल्याने काही प्रवासी जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Pramod Yadav

गोव्याहून नेपाळकडे जाणारी बसचा उत्तर प्रदेश राज्यातील बांदा-बहराइच येथे अपघात झाला. बुधवारी (३० ऑक्टोबर) सकाळी बांदा-बहराइच रस्त्यावरील राधानगर येथे बस उलटल्याने हा अपघात झाला.

अपघातात एका मुलीसह आठ जण जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. बसमध्ये चालकासह 40 जण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळ आणि बहराइचमधील अनेक लोक दिवाळीसाठी गावाला जात होते. अनेकजण महाराष्ट्रातील कराड भागातील कारखान्यात मजूर होते, तर काहीजण गोव्यात कामाला होते.

बस गोव्यामार्गे नेपाळला जात होती. बुधवारी सकाळी कटका बायपासजवळ ट्रॅक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली. यावेळी बसमध्ये ४० प्रवासी होते. बस उलटल्याने काही प्रवासी जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस चालक अर्जुनने स्थानिक पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस इंदूरची आहे. सर्वजण गोव्याहून नेपाळला जात होते.

अपघातात मेनका मेरी (60, रा.रुकुम नेपाळ), शांती देवी (35) यांच्यासह आठ जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिस स्टेशन प्रभारी रमेश पटेल यांनी सांगितले. सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT