Assam  Dainik Gomantak
देश

Assam: प्रियकरासोबत रचला कट, पती आणि सासूची हत्या करून फ्रीजमध्ये ठेवले मृतदेहांचे तुकडे, काही दिले फेकून

पोलिसांच्या प्राथमिक तपासात वंदनाचे विवाहबाह्य संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Pramod Yadav

दिल्लीत श्रद्धा वालकर आणि निक्की यादव यांच्या हत्या करून मृतदेहांचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याची घटना समोर आली होती. अशीच आणखी एक घटना आता आसाममधूनही समोर आली आहे.

एका महिलेने आपल्या पती आणि सासूची हत्या करून त्यांचे मृतदेह फ्रीजमध्ये लपवून ठेवल्याचा आरोप पोलिसांनी केला. आसाममधील नूनमती भागात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेची वंदना कलिता असे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात वंदनाचे विवाहबाह्य संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे वंदनाने पती अमरज्योती डे आणि सासू शंकरी डे यांची हत्या केली.

दोघांची हत्या केल्यानंतर तीन दिवसांनी वंदनाने प्रियकराच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे करून काही तुकडे मेघालयातील चेरापुंजी येथे फेकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वंदना आसाम पोलिसांच्या टीमला चेरापुंजी येथे घेऊन गेली. याठिकाणी तिने तिच्या प्रियकरासोबत तिच्या पती आणि सासूच्या मृतदेहाचे काही तुकडे फेकले होते. तिने दोन्ही मृतदेहांचे काही तुकडे अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते. अशी माहिती वंदनाने पोलिस अधिकाऱ्यांना दिली. घटनेची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, देशात खासकरून दिल्लीत दोन अतिशय क्रूर पद्धतीने हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. श्रद्धा वालकर आणि निक्की यादव अशी ही दोन प्रकरणे आहेत. यात देखील त्यांची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवले होते. या घटनेतील आरोपी अटक असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT