Vaccination Dainik Gomantak
देश

Monkeypox: दिल्लीत 31 वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण, देशात आत्तापर्यंत 9 रुग्ण

Monkeypox Cases: दिल्लीत एका महिलेला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

Monkeypox Cases in Delhi: दिल्लीत एका महिलेला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय नायजेरियन महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत चार जणांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. त्याचवेळी केरळमध्ये पाच रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशात मंकीपॉक्स लागण झालेल्यांची संख्या 9 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज मंकीपॉक्सचा (Monkeypox) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे आणि काय करु नये ची यादी जारी केली आहे. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, जर एखादी व्यक्ती संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात बराच काळ किंवा वारंवार येत असेल तर त्याला देखील संसर्ग होऊ शकतो.

मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, 'संसर्ग टाळण्यासाठी संक्रमित व्यक्तीला इतर व्यक्तींपासून दूर ठेवावे. याशिवाय, हँड सॅनिटायझरचा वापर, साबण आणि पाण्याने हात धुणे, मास्क आणि हातमोजे घालावेत.'

दुसरीकडे, मंत्रालयाने पुढे असेही म्हटले आहे की, संक्रमित आढळलेल्या रुग्णासोबत रुमाल, बेडिंग, कपडे, टॉवेल आणि इतर वस्तू शेअर करणे टाळावे. तसेच रुग्ण आणि संसर्ग नसलेल्या व्यक्तींचे कपडे एकत्र न धुण्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळण्याचा सल्लाही दिला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, “संक्रमित आणि संशयित रुग्णांमध्ये भेदभाव करु नका. याशिवाय कोणत्याही अफवा किंवा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: मडगावात पादचारी पूल बंद! टॅक्सीचालक, दुकानदारांमध्ये नाराजी; साबांखा मंत्र्यांनी केली पाहणी

Goa Liberation Day: 'ऑपरेशन विजय'च्या शूरवीरांना सलाम! राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांकडून 'गोवा मुक्ती दिना'च्या शुभेच्छा

Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

रॉड्रीक्स यांच्या प्रयत्नाने मुंबईत गोमंतकीयांची प्रचंड सभा भरली, 20 हजार गोवावासीय उपस्थित होते; ‘छोडो गोवा’ ठराव संमत झाला

Goa Politics: 'मतदारांचा भाजप-मगो युतीलाच पाठिंबा'! आमदार आरोलकरांचा विश्वास; धारगळमधून हरमलकर यांच्या विजयाची खात्री व्यक्त

SCROLL FOR NEXT