pani puri protest Dainik Gomantak
देश

Viral Video: पाणीपुरीसाठी महिलेचा राडा! भररस्त्यात बसून अडवली वाहतूक, म्हणते, 'मला दोन पाणीपुरी खाऊ घाला, नाहीतर...'

Vadodara Viral Video: सोशल मीडियावर दररोज काहीतरी अजब आणि अतरंगी घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.

Manish Jadhav

Vadodara Viral Video: सोशल मीडियावर दररोज काहीतरी अजब आणि अतरंगी घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून हा व्हिडिओ पाहून अनेकजण आपले डोके पकडून बसले आहेत. गुजरातच्या वडोदरा शहरात एक अत्यंत विचित्र घटना घडली, जिथे एका महिलेने चक्क 'पाणीपुरी' कमी मिळाल्याच्या रागातून भररस्त्यात बसली. तिच्या अशा या हरकतीमुळे वाहतूक कोंडी झाली.

आधी हा व्हिडिओ पाहा!

'एक्स' वर व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, ही घटना वडोदरा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सुरसागर तलावाजवळ घडली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर @rajgarh_mamta1 नावाच्या अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्याच्या मध्यभागी बसलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती काहीच बोलत नसली तरी, तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून ती खूपच नाराज असल्याचे स्पष्ट होते. या व्हिडिओसोबत असलेल्या कॅप्शनने मात्र सर्वांनाच धक्का बसला आहे. कॅप्शनमध्ये दावा करण्यात आला की, ही महिला फक्त आणि फक्त दोन पाणीपुरी कमी मिळाल्यामुळे रस्त्यावरच बसली.

दोन पुरींचा वाद आणि गोंधळ

व्हिडिओच्या कॅप्शननुसार, ही महिला पाणीपुरी खाण्यासाठी एका गाडीवर गेली होती. तिने 20 रुपयांची पाणीपुरी मागितली. सामान्यतः 20 रुपयांत 6 पाणीपुरी दिल्या जातात, परंतु त्या विक्रेत्याने तिला फक्त 4 पाणीपुरी दिल्या. दोन पुरी कमी मिळाल्याच्या रागातून ही महिला संतप्त झाली आणि तिने रस्त्यातच बसून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तिच्या या विचित्र कृतीमुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली.

काही वेळातच या गर्दीमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. शहराच्या गजबजलेल्या भागात झालेल्या या गोंधळामुळे वाहनचालक आणि पादचारी त्रस्त झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी DIAL 112 ची टीम आणि स्थानिक पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी महिलेला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. तिने पोलिसांसमोरच (Police) रडायला सुरुवात केली आणि लहान मुलासारखा हट्ट धरला. "एकतर मला दोन पुरी खाऊ घाला, किंवा या पाणीपुरीवाल्याची गाडी कायमची इथून हटवा," अशी तिने पोलिसांकडे मागणी केली.

नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया

त्याचवेळी, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले. एका युजरने लिहिले, "याला म्हणतात चवीची भूक! मी तर कधी पाणीपुरी मोजून खाल्ली नाही." तर दुसऱ्या एका युजरने, "हा तर मूर्खपणाचा कळस आहे. असे लोकही या जगात आहेत?" अशी प्रतिक्रिया दिली. अनेकांनी या महिलेच्या वागणुकीवर टीका केली, तर काही लोकांनी विनोदी मीम्स तयार करुन तिचा 'पाणीपुरीसाठी रास्ता रोको' अशी उपाहासातत्मक टीप्पणी केली.

अखेरीस, बराच वेळ चाललेल्या या नाट्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला (Women) समजावून रस्त्यावरुन बाजूला केले, त्यानंतरच वाहतूक पूर्ववत झाली. ही घटना एकीकडे विनोदाचा विषय ठरली असली, तरी दुसरीकडे एखाद्या क्षुल्लक कारणावरुन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याची ही वृत्ती चिंताजनक असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasudev Balwant Phadke: नोकरीला लाथ मारली, अन्यायाविरुद्ध लढा उभारला, इंग्रजांना सळो की पळो केलं, पण फंद फितुरीनं घात केला; वाचा वासुदेव बळवंत फडकेंची संघर्षगाथा!

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT