Mohali office murder cas Dainik Gomantak
देश

Crime News: ब्रेकअपनंतर पुन्हा नात्यासाठी दबाव, नकार मिळताच भर ऑफिसमध्ये प्रेयसीची निर्घृण हत्या! थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Mohali office murder case: पंजाबमधील मोहाली येथून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

मोहाली: पंजाबमधील मोहाली येथून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. फेज-११ मधील बेस्टेक मॉल (सेक्टर-६६) जवळ असलेल्या एका खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या ३० वर्षीय तरुणीची तिच्याच माजी प्रियकराने धारदार चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. हा संपूर्ण थरार कार्यालयातील सहकाऱ्यांसमोर घडला. तरुणीचा जीव घेतल्यानंतर आरोपीने स्वतःवरही चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या आरोपीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

३ वर्षांचे प्रेम आणि ६ महिन्यांपूर्वी झालेला दुरावा

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव डिंपल (वय ३० वर्षे) असून ती पटियालाची रहिवासी होती. तर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव हरविंदर सिंह मान उर्फ हॅरी (वय ३४ वर्षे) आहे. हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून मोहालीतील एका पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीत एकत्र काम करत होते. एकत्र काम करत असतानाच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

मात्र, काही कारणास्तव सुमारे ६ महिन्यांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअप झाल्यानंतर हरविंदर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि डिंपलवर पुन्हा नातं सुरू करण्यासाठी सतत दबाव टाकत होता. मात्र, डिंपलने त्याच्याशी सर्व संबंध तोडून पूर्णपणे अंतर राखले होते. याच नकाराच्या रागातून हरविंदरने तिच्या हत्येचा कट रचला.

ऑफिसमध्ये थरार; सहकाऱ्यांना दाखवला चाकू

गुरुवारी संध्याकाळी डिंपल नेहमीप्रमाणे तिच्या ऑफिस डेस्कवर काम करत होती. त्याच वेळी तिथे हरविंदर पोहोचला आणि त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात हरविंदरने सोबत आणलेला चाकू काढला आणि डिंपलवर हल्ला केला.

जीव वाचवण्यासाठी डिंपल संपूर्ण ऑफिसमध्ये इकडे-तिकडे पळत राहिली, पण माथेफिरू हरविंदरने तिला पाठलाग करून चाकूने भोसकले. ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांनाही चाकू दाखवून दूर राहण्याची धमकी दिली आणि तो डिंपलवर वार करत राहिला. हा संपूर्ण थरारक प्रकार ऑफिसमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हल्लेखोर रुग्णालयात; पोलीस तपास सुरू

डिंपलला रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर, हरविंदरने त्याच चाकूने स्वतःच्या शरीरावरही अनेक वार केले आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. ऑफिसमध्ये झालेल्या या गोंधळानंतर स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोघांनाही मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच डिंपलला मृत घोषित केले. दुसरीकडे, आरोपी हरविंदरची प्रकृती अत्यंत गंभीर असून तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. पोलिसांनी कार्यालयातील CCTV फुटेज ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT