Surat Gujrat 
देश

प्रियकरासाठी अडीच वर्षांच्या मुलाची आईनेच केली हत्या, अटक टाळण्यासाठी पाहायची अजय देवगनचा 'दृश्यम'

मृतदेह कुठे लपवून ठेवला असे विचारले असता तिने विविध खोटी माहिती दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

अजय देवगनचा अभिनय असलेल्या दृश्यम चित्रपटाचे दोन भाग येऊन गेले, दोन्ही भागात भरपूर सस्पेन्स आणि ड्रामा पाहायला मिळाला. प्रेक्षकांनी चित्रपटाचे दोन्ही भाग चांगलाच उचलून धरले. मात्र, सुरत - गुजरातमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेने पोटच्या अडीच वर्षीय मुलाची हत्या केली आणि तो खून लपवण्यासाठी तिने दृश्यम चित्रपटाचा मदत घेतली.

पोलिसांनी घटनेचा तपास केल्यानंतर मुलाच्या आई याप्रकरणी दोषी आढळली असून, तिला अटक करण्यात आली आहे.

नयना मांडवी असे या बांधकाम मजूर असलेल्या महिलेचे नाव असून, ती सुरतच्या दिंडोली भागात वास्तव्यास आहे. नयनाने तिचा अडीच वर्षाचा मुलगा झाल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली.

पोलिसांनी महिला काम करत असलेल्या बांधकामाच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा घरातून बाहेर जाताना दिसला नाही. त्यावरून पोलिसांनी मुलगा बाहेर गेला नसल्याचा निष्कर्ष काढला.

पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली, परंतु तिने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही.

पोलिसांनी बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले. परंतु पोलिसांना ठोस पुरावा मिळाला नाही. दरम्यान, महिलेने झारखंडमध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकरावर मुलाचे अपहरण केल्याचा आरोप केला.

पोलिसांनी महिलेच्या प्रियकराशी संपर्क साधला असता त्याने तो कधीच सुरतला गेला नसल्याची माहिती दिली.

मुलगा घरातून बाहेर पडला नाही, तसेच अपहरण केल्याची कोणताही पुरावा समोर आला नाही. त्यामुळे मुलाचा ठावठिकाणा शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यानंतर पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली, अखेरीस तिने आपल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

मात्र, तिने मृतदेह कुठे लपवून ठेवला असे विचारले असता तिने सुरुवातीला खोटी माहिती दिली. सुरुवातीला, महिलेने मृतदेह खड्ड्यात पुरल्याचे सांगितले पण खोदकाम केल्यानंतर मृतदेह आढळला नाही. त्यानंतर तिने मृतदेह तलावात फेकल्याचे पोलिसांना सांगितले, मात्र तेथेही पोलिसांना काहीही सापडले नाही.

सखोल चौकशी केल्यानंतर महिलेने मृतदेह बांधकाम साइटच्या शौचालयासाठी केलेल्या खड्ड्यात टाकल्याची कबुली दिली. अखेर पोलिसांनी त्या ठिकाणी मुलाचा मृतदेह सापडला. महिला मृतदेह लपवण्यासाठी दृश्यम चित्रपट पाहत असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT