Viral Video: महापौराने चक्क मगरीशी केले लग्न, Kiss घेऊन डान्सही केला; पाहा व्हिडिओ

चोंटल आणि हुआवे येथे शांततेसाठी अशा पद्धतीने विवाह विधी गेल्या 230 वर्षांपासून केला जात आहे.
The mayor of Mexico’s San Pedro Huamelula married a crocodile
The mayor of Mexico’s San Pedro Huamelula married a crocodile
Published on
Updated on

The mayor of Mexico’s San Pedro Huamelula married a crocodile

मेक्सिकोतून एक विचित्र बातमी समोर आली आहे. सॅन पेड्रो हुआमेलुला शहराचे महापौर व्हिक्टर ह्यूगो सोसा यांनी चक्क एका मगरीशी लग्न केले आहे. मगरीशी लग्न केल्याने सौभाग्य प्राप्त होते, अशी समजूत आहे. विशेष म्हणजे तेथील इतिहासात मगरीला राजकुमारी कन्या म्हणून पाहिले जाते.

"आमचे एकमेकांवर प्रेम आहे. मी लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो. तुम्ही प्रेम असल्याशिवाय लग्न करू शकत नाही, मी राजकुमारी कन्येशी लग्न करत आहे." असे या महापौर यांनी लग्नानंतर म्हटले आहे.

चोंटल आणि हुआवे येथे शांततेसाठी अशा पद्धतीने विवाह विधी गेल्या 230 वर्षांपासून केला जात आहे. चोंटल राजाचे प्रतीक असलेल्या मगरीशी महापौरांचे लग्न दोन संस्कृतींच्या मिलनाचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.

The mayor of Mexico’s San Pedro Huamelula married a crocodile
Goa Monsoon 2023: गोव्यात रविवारी कुठे किती पावसाची नोंद? येत्या 4 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा वाचा सविस्तर

दोघांचे लग्न चोंटल येथील लोकांसाठी शांतता आणि सुसंवादाचे प्रतीक असलेल्या सर्व गोष्टींसाठी प्रार्थना मानली जात आहे. विवाह समारंभ समुदायांना पृथ्वीशी जोडतात आणि पाऊस, पीक उगवण आणि सुसंवाद यासाठी आशीर्वाद देतात.

समारंभाच्या आधी मगरीला नृत्यासाठी लोकांच्या घरी नेले जाते. मगरीला वेषभूषा करून संरक्षणासाठी तोंड बांधले जाते. लग्न टाऊन हॉलमध्ये झाले. शेवटी महापौर वधूसोबत नाचतात आणि हा कार्यक्रम संस्कृतींच्या संमेलनाचा उत्सव साजरा होतो. महापौरांनी मगरीचे चुंबन घेऊन समारंभाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com