Crime News Dainik Gomantak
देश

Delhi Crime: दिल्लीत पुन्हा श्रद्धासारखे हत्या प्रकरण, सराय काले खानमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

Delhi Murder: राजधानी दिल्लीतून क्रूरतेची सीमा ओलांडणारी आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Manish Jadhav

Delhi Murder: राजधानी दिल्लीतून क्रूरतेची सीमा ओलांडणारी आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेचा मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये सापडला आहे.

हे प्रकरण दिल्लीतील सराय काले खान भागातील आहे. महिलेचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासात गुंतले.

मात्र, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. महिलेची (Woman) हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले. काही काळापूर्वी दिल्लीत श्रद्धा खून प्रकरण चर्चेत आले होते.

श्रद्धाचा प्रियकर आफताब याने तिची हत्या केल्यानंतर तिचे तुकडे केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सराय काले खान बसस्थानकाजवळ मृतदेह आढळून आला, त्यानंतर लोकांनी तिथे जमा होऊन पोलिसांना माहिती दिली.

तसेच, दुपारी बाराच्या सुमारास सन लाईट कॉलनी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मृतदेह सापडल्याची खबर मिळाली. पोलिसांनी (Police) घटनास्थळी पोहोचून पॉलिथिन उघडले असता, त्यामध्ये महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे आढळून आले.

दुसरीकडे, पोलिसांना लेडीची कवटी, एका नितंबाचा काही भाग, हाताचा काही भाग आणि एका हाताचा पंजा पांढऱ्या रंगाच्या पॉलिथिनमध्ये सापडला आहे. अद्यापपर्यंत मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

त्याचबरोबर, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. फॉरेन्सिक सायन्स टीमने घटनास्थळाची पाहणी करुन पुरावे गोळा केले. हत्येचे गूढ उकलण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा तैनात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

व्हॉट्सॲप कॉल अन् CBI ची धमकी! 90.85 लाख उकळणारा केरळचा 21 वर्षीय भामटा जेरबंद; गोवा पोलिसांकडून 'डिजिटल अरेस्ट'चा पर्दाफाश

Crime News: तिचे केस तुला आवडतात ना? मग घे! प्रियकराच्या 'त्या' एका वाक्यानं प्रेयसीचं डोकं सरकलं अन् रागात तिनं...

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई 'GAY', डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'रिपोर्ट वाचून मला हसू आलं'

Hidden Gems in Goa: उन्हाळ्याच्या उकाड्यात गोव्याचा गारवा! एप्रिल-मेमध्ये सहलीचे नियोजन करताय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Tecno Spark 50 5G: 6500 mAh बॅटरी, 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा...टेक्नोने लाँच केला नवा स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फीचर्स

SCROLL FOR NEXT