Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Woman Blocking Train Track Viral Video: सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा आणि रेल्वे प्रशासनाची झोप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

Manish Jadhav

Woman Blocking Train Track Viral Video: आजच्या डिजिटल युगात लोकांना जेव्हा कधी रिकामा वेळ मिळतो किंवा कंटाळा येतो, तेव्हा ते थेट सोशल मीडियाचा आधार घेतात. दररोज इंटरनेटवर हजारो व्हिडिओ पोस्ट होत असतात आणि नेटकरी ते पाहून आपला वेळ घालवतात. जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल, तर आजपर्यंत तुम्ही अनेक अजब-गजब आणि थरारक व्हिडिओ पाहिले असतील. सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा आणि रेल्वे प्रशासनाची झोप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक लोकल ट्रेन रेल्वे ट्रॅकवरुन अगदी संथ गतीने पुढे जाताना दिसत आहे. मात्र, त्याचवेळी समोरुन एक महिला रुळावरुन थेट ट्रेनच्या दिशेने चालत येताना दिसते. धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या हातात एक मोठा दगडही दिसत असतो. रेल्वे रुळावर महिला उभी असल्याचे पाहून प्रसंगावधान राखत लोको पायलटने ट्रेन वेळेत थांबवली. ट्रेन थांबताच ती महिला रुळावरुन बाजूला होते आणि थोडी पुढे जाते. पण पुढच्याच क्षणी ती महिला थेट थांबलेल्या ट्रेनच्या दिशेने हातातील दगड भिरकावून मारते आणि तिथून निघून जाते. ही महिला नक्की कोण आहे, तिने हे कृत्य का केले, तसेच हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आणि कधीचा आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, या हाय-व्होल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे.

हा व्हिडिओ 'एक्स' वर एका युझरने पोस्ट केला असून, कॅप्शनमध्ये रेल्वेच्या वाढत्या अडचणींबद्दल आणि मानवी जीवाच्या बेजबाबदारपणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युझरने संतापून लिहिले की, 'ट्रेनसोबत तिची काय दुश्मनी आहे देव जाणे.' तर अनेकांनी या महिलेच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काहींच्या मते ही महिला (Women) मानसिकदृष्ट्या आजारी असू शकते, तर एका युझरने उपरोधिक टोमणा मारत लिहिले, 'ही महिला लोको पायलटची पत्नी तर नाही ना!' कारण काहीही असो, पण अशा कृत्यांमुळे प्रवाशांच्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

SCROLL FOR NEXT