Chief Minister Yogi Adityanath dainik gomantak
देश

भाजप कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

लखनऊ : सीएम योगी भाजप कार्यालयात; बाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूका झाल्या असून त्याचा निकाल ही लागला. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये योगी 2.0 सरकारला सुरूवात केली आहे. यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकानी दौरे सुरू केले आहेत. यादरम्यान त्यांचा दौरा सुरू असतानाच एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. (woman attempted to kill herself in front of the Bharatiya Janata Party’s office in Lucknow)

लखनऊ विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष (भाजप) कार्यालयात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) पोहोचल्यानंतर एका घटनेमुळे एकच खळबळ माजली. येथे एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी महिलेला आत्मदहनपासून रोखले. तसेच पोलीसाकडून त्या महिलेची चौकशी सुरू आहेत. राम प्यारी असे त्या महिलेचे नाव असून ती लखनऊच्या (Lucknow) रानीखेडा येथील रहिवासी आहे. पोलीस आपल्या मुलाचा छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला असून, माझा मुलगा निर्दोष आहे, मात्र गोसाईगंज पोलीस त्याला जबरदस्तीने तुरुंगात पाठवत आहेत, असं तिने म्हटलं आहे. घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी त्या महिलेला रुग्णालयात पाठविलं असून प्राथमिक उपचारानंतर तिची चौकशी केली जाणार आहे.

अंगावर रॉकेल ओतून महिला पोहोचली होती

महिला भाजप कार्यालयाबाहेर (BJP office) पोहोचली तेव्हा तिने रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिला पाहताच पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ महिलेकडे धाव घेत आत्मदहन करण्यापासून रोखले. यादरम्यान ती महिला गोसाईगंज पोलिसांवर वारंवार आरोप करत होती. यासोबतच महिलेने सीएम योगी यांच्याकडे न्यायाची मागणी केली.

सीएम योगी भाजप कार्यालयात, बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी भाजप कार्यालयात आले होते. त्यावेळी महिलेने भाजप कार्यालयाबाहेर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री योगी या कार्यक्रमानंतर येथून ते विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात राज्याच्या प्रमुखांशी अक्षरश: संपर्क साधणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

SCROLL FOR NEXT