…तर भारतात पेट्रोल, डिझेलच्या किंमती स्वस्त होऊ शकतात

रशियाची भारताला कच्चे तेल खरेदी करण्यासाठी आकर्षक ऑफर
crude oil
crude oildainik gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली : सध्या देशातील जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. त्यातच दरदरोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत असल्याने विरोधक आक्रमक झाले असून देशात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहे. तर वाढणाऱ्या किंमतीमुळे आपली वाहने गप पार्क करावीत आणि दुसरा पर्याय निवडावा अशा विंवचनेत सामान्यजनता आहे. याचदरम्यान रशियाने भारताला एक आकर्षक ऑफर दिली असून त्याचा थेट पेट्रोल, डिझेलच्या किंमती होऊन ते स्वस्त होऊ शकते. (Russian offer to India to sell its crude oil cheap and bear the cost of insurance and transportation)

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून ते संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तर असे झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) दरातही घसरण होऊ शकते. सध्या रशिया आणि युक्रेन युद्धाच्या संपुष्टात येण्याच्या शक्यतेमुळे कच्चे तेल प्रति बॅरल 5 डॉलरने उतरले आहे. त्यामुळे सध्या कच्चे तेल प्रति बॅरल 108 डॉलर आहे.

दरम्यान रशियाने आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींच्या तुलनेत प्रति बॅरल $ 35 च्या सवलतीने कच्चे तेल विकण्याची ऑफर दिली आहे. रशियाच्या या ऑफरवर मोदी सरकार (Modi government) गांभीर्याने विचार करत आहे. रशियाने भारताला कच्च्या तेलाची विक्री करताना शिपिंग आणि विमा खर्चाची जबाबदारी घेण्याची तयारीही दर्शवली आहे.

crude oil
Russia-Ukraine War: रशियन सैनिक धुडकावताहेत आदेश

त्यामुळे भारत लवकरच रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करणार आहे. रशियाने भारताला कच्चे तेल स्वस्तात विकण्याची ऑफर दिली असून भारतातील ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. तर पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत (Parliament) सांगितले होते की, भारत रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्याचा विचार करत आहे. महागड्या कच्च्या तेलामुळे हैराण झालेल्या भारताला रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी केल्यास त्याचा मोठा फायदा होणार आहे. तथापि, केंद्र रशियाला कच्चे तेल खरेदी करण्यासाठी पेमेंटची पद्धत काय असावी यावर विचार करत आहे. रुपया-नियम व्यवस्था हा एक पर्याय आहे परंतु अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची अपेक्षा आहे.

रशिया हा भारताचा सर्वात विश्वासू जुना मित्र आहे. त्यामुळे रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धाबाबत (War) संयुक्त राष्ट्रात रशियाविरोधातील मतदानात भारताने भाग घेतला नाही. त्याचबरोबर भारताचे तेल रशियाकडून विकत घेण्यास अमेरिकेलाही हरकत नाही. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, भारत रशियन तेलावर सूट देऊन निर्बंधांचे उल्लंघन करत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com