With one answer Rahul Gandhi won hearts of millions of indian women  Dainik Gomantak
देश

पंतप्रधानपदी विराजमान होताच महिलांसाठी राहूल गांधी घेणार महत्वाचा निर्णय

ही तीच शाळा आहे जिथे राहूल गांधींनी पुश-अप केले होते

दैनिक गोमन्तक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील शाळेतील पाहुण्यांसाठी दिवाळी डिनरचे आयोजन केले होते. ही तीच शाळा आहे जिथे राहुल गांधी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला तामिळनाडू विधानसभेच्या (Assembly elections) निवडणूक प्रचारादरम्यान भेट दिली होती. मुलुगुमुडू येथे असलेल्या या शाळेचे नाव सेंट जोसेफ उच्च माध्यमिक विद्यालय आहे. ही तीच शाळा आहे जिथे त्यांनी पुश-अप केले होते.

रात्रीच्या जेवणादरम्यान झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. "त्यांच्या भेटीमुळे दिवाळी आणखी खास झाली. संस्कृतींचा हा संगम आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती आपण जपली पाहिजे," असे कॅप्शन या व्हिडिओला गांधींनी दिले.

पंतप्रधान झाला तर तुम्ही काय कराल?

ट्विटरवर शेअर केलेल्या एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये एका पाहुण्याने त्यांना विचारले की, तुम्ही पंतप्रधान झालात तर तुमचा पहिला आदेश कोणता असेल. त्याला उत्तर देताना केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, मी महिलांना आरक्षण देईन. मुलांना काय शिकवणार असे विचारले असता. यावर राहुल गांधी म्हणाले की, जर मला कोणी विचारले की तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवाल, तर मी फक्त एकच सांगेन की नम्रता, कारण नम्रता तुम्हाला समज देते.

डिनरला छोले भटुरेचा बेत

दिवाळी डिनरदरम्यान राहुल गांधींनी छोले भटुरेंचा बेत ठेवण्यात आला होता. आणि मस्त गप्पाही रंगल्या होत्या.व्हिडिओमध्ये एक व्यक्ती राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिलेल्या समर्थनाचे कौतुक करताना दिसत आहे. यातून खरोखरच तुमची लोकांशी असलेली एकजूट दिसून येत आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही दिवाळी डिनरमध्ये पाहुण्यांशी संवाद साधला. त्याच्यासोबत गाणे गायले आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

Today's Live Updates Goa: सनबर्न विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच 'सरकार'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

Saint Francis Xavier Exposition: संशयित व्यक्तीची होणार चौकशी, CCTV तैनात; 98 टक्के काम पूर्ण; मुख्यमंत्री सावंत

IFFI Goa 2024: 'मोबाईल थिएटर' इफ्फीचे खास आकर्षण; प्रेक्षकांना मिळणार RRR आणि अपराजितोचा फिरता अनुभव

SCROLL FOR NEXT