Winter Solstice Dainik Gomantak
देश

Winter Solstice 2022 Today: ...म्हणून आज असतो सर्वात लहान दिवस

Winter Solstice 2022 Today: आज वर्षातील सर्वात लहान दिवस असणार आहे.

दैनिक गोमन्तक

आज 2022 मधील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र आहे. याला विंटर सोल्सटिस म्हणतात. आज तुमचा दिवस 10 तास 41 मिनिटांचा आणि रात्र 13 तास 19 मिनिटांची असणार आहे. तुम्ही कोणत्या देशात किंवा शहरात आहात, यावरुनही दिवस आणि रात्र किती वेळ असणार हे ठरत असते. Solstice हा लॅटिन शब्द आहे, जो Solstim वरून आला आहे. लॅटिन शब्द सोलचा अर्थ सूर्य असा होतो, तर सेस्टेअरचा अर्थ स्थिर राहणं. या दोन शब्दांना एकत्र करून सॉल्सटिस हा शब्द तयार झाला आहे, ज्याचा अर्थ सूर्याचं स्थिर राहणं असा होतो. या नैसर्गिक बदलांमुळे 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते.

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना सूर्य मकर राशीच्या उष्ण कटिबंधावर असतो. यामुळे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते. मध्य भारताबद्दल (India) बोलायचे झाले तर तिथे सूर्योदय सकाळी 7.05 वाजता होईल. तर, सूर्यास्त संध्याकाळी 5.46 वाजता होईल. म्हणजे दिवसाची वेळ 10 तास 41 मिनिटे असणार आहे, तर रात्रीची वेळ 13 तास 19 मिनिटं असेल. या दिवशी सूर्यप्रकाशाचा कोन 23 अंश 26 मिनिटं 17 सेकंद दक्षिणेकडे असेल. पुढील वर्षी 21 मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर असेल, त्यावेळी दिवस आणि रात्र समान वेळेची असेल.

इतर ग्रहांप्रमाणे पृथ्वी (Earth) देखील 23.5 अंशांवर झुकलेली आहे. झुकलेल्या अक्षावर पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याची किरणं एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडतात. त्यामुळेच, विंटर सॉल्सटिसच्या वेळी दक्षिण गोलार्धात विंटर सॉल्सटिस जास्त सूर्यप्रकाश असतो.

दरम्यान, उत्तर गोलार्धात कमी सूर्यप्रकाश असतो. या कारणास्तव, या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धात जास्त काळ राहतो. यामुळे येथे दिवस मोठा असतो. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये आजपासून उन्हाळा (Summer) सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT