Nitin Gadkari Dainik Gomantak
देश

Nitin Gadkari: विहिरीत उडी मारेन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही - नितीन गडकरी

गोमन्तक डिजिटल टीम

'मी विहिरीत उडी मारुन मरुन जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण काँग्रेसची विचारधारा आपल्याला पसंत नाही.' केंद्रिय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूर येथे उद्योजकांच्या एका कार्यक्रमात बोलत असताना आपली जुनी आठवण सांगितली. भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी भाजपाच्या संसदीय बोर्डातून हटवण्यात आले आहे.

नागपुरात उद्योजकांच्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, 'कोणताही व्यक्ती पराभूत होतो, याचा अर्थ तो संपत नाही. मात्र जेव्हा तो स्वत: पराभव स्वीकारतो, त्याचवेळी तो संपतो. याचवेळी त्यांनी सध्याच्या वापरा आणि फेकून द्या या संस्कृतीचा भाग होऊ नका. जे ही कोणी व्यवसायात आहेत, सामाजिक कार्यात आहेत किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद आहे.' असे गडकरी म्हणाले.

विहिरीत उडी मारेन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही

नितीन गडकरी यांनी यावेळी आपला एक जुना किस्सा सांगितला. नितीन गडकरी म्हणाले, तरुण वयात विद्यार्थी चळवळीत काम करत असताना, काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकार यांनी आपल्याला काँग्रेसमध्ये प्रवेश करा, असे सांगितले होते. त्यावेळी गडकरी यांनी श्रीकांत जिचकार यांना, 'मी विहिरीत उडी मारुन मरुन जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण काँग्रेसची विचारधारा आपल्याला पसंत नाही.' असे उत्तर दिल्याचे नितीन गडकरी यांनी कार्यक्रमात सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT