PM Narendra Modi | Lok Sabha Election 2023 Dainik Gomantak
देश

PM Narendra Modi: खरंच, पंतप्रधान मोदी तामिळनाडुतून निवडणूक लढवणार?

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपचे दक्षिण भारतातील 100 जागांवर लक्ष्य

Akshay Nirmale

PM Narendra Modi: सन २०२४ म्हणजेच पुढच्याच वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर देशाचा मूड जाणून घेणारे सर्व्हेक्षण नुकतेच करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या राज्यांमध्ये भाजपची स्थिती कमकुवत असल्याचे म्हटले आहे.(Lok Sabha Elections 2024)

दरम्यान, भाजपच्या रणनीतीचा एक भाग म्हणून आता पंतप्रधान मोदी तामिळाडुतून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात का, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

तामिळनाडू भाजपचे प्रमुख के. अन्नमल्लई यांनी पंतप्रधानांनी तामिळनाडूतून निवडणूक लढविण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला आहे.

अण्णामल्लई यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत म्हटले आहे की, तामिळनाडूतील काही लोक नरेंद्र मोदींना बाहेरचा माणूस म्हणून प्रमोट करत आहेत.

पीएम मोदींनी प्रादेशिक अडथळे ओलांडले आहेत. ते तामिळनाडूमध्ये निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक ही वेगळ्या प्रकारची असेल. रामनाथपुरममध्ये चर्चा सुरू आहे, मात्र ही अफवा आहे.

भाजपच्या संसदीय मंडळात प्रत्येक जागेवर चर्चा करून उमेदवारांची नावे निश्चित केली जातात. 2019 मध्येही पीएम मोदी ओडिशातील पुरी किंवा यूपीमधील वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र शेवटच्या क्षणी संसदीय मंडळाने वाराणसीची घोषणा केली. पीएम मोदी तामिळनाडूतूनही निवडणूक लढवू शकतात.

दक्षिणेतील काँग्रेसचा वाढता जनाधार आणि तामिळनाडूमध्ये वेगळ्या द्रविनाडूची मागणी हे त्याचे सर्वात मोठे कारण आहे. 2019 मध्ये भाजपला तामिळनाडूमध्ये 39 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. 2014 मध्ये कन्याकुमारीची जागा भाजपने जिंकली होती.

अशा स्थितीत पीएम मोदींनी निवडणूक लढवल्यास भाजप कन्याकुमारीची जागा निवडू शकते, असे मानले जात आहे. 2019 मध्ये, कोईम्बतूर, शिवगंगाई, रामनाथपुरम, कन्याकुमारी आणि थुथीकुड्डी या जागांसह तामिळनाडूमधील 5 जागांवर भाजप दुसऱ्या स्थानावर आहे. कन्याकुमारीव्यतिरिक्त पंतप्रधान या चारपैकी कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतात.

अलीकडेच तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी तामिळनाडूचा उल्लेख तमिझगम असा केला होता. तामिळनाडू म्हणजे तामिळ लोकांचा देश किंवा राष्ट्र. तर तमिझगम म्हणजे तमिळ लोकांचे घर. राज्यपालांच्या या वक्तव्यानवर सत्ताधारी पक्षाचे नेते भडकले आणि त्यांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.

दक्षिण भारतावर भाजपचे लक्ष

दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात मिळून लोकसभेच्या एकूण 129 जागा आहेत. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातही एक जागा आहे. 2019 मध्ये 303 जागा जिंकणाऱ्या भाजपला या 130 जागांपैकी फक्त 29 जागा मिळाल्या, त्यात कर्नाटकातील 25 जागांचा समावेश आहे.

दक्षिणेकडील तीन राज्यांमध्ये (तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश) भाजपचे खातेही उघडले नाही. सर्व्हेनुसार, आता निवडणुका झाल्यास महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजपला झटका बसू शकतो. अशा परिस्थितीत दक्षिणेकडील इतर राज्यांतून कमी झालेल्या जागांची भरपाई भाजप करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

SCROLL FOR NEXT