Elephant Dainik Gomantak
देश

Jharkhand: हत्तीच्या भीतीने रांचीत कलम 144 लागू, 12 दिवसांत 16 जणांचा चिरडून मृत्यू

झारखंडमध्ये गजराजची दहशत कायम आहे. कळपापासून विभक्त झालेल्या हत्तीने 12 दिवसांत 16 जणांचा बळी घेतला.

Manish Jadhav

Jharkhand: झारखंडमध्ये गजराजची दहशत कायम आहे. कळपापासून विभक्त झालेल्या हत्तीने 12 दिवसांत 16 जणांचा बळी घेतला. ताजे प्रकरण झारखंडची राजधानी रांचीमधील आहे. येथे कळपापासून विभक्त झालेल्या हत्तीने 5 लोकांना चिरडले, त्यापैकी 4 लोकांचा मृत्यू झाला. 1 व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर RIMS येथे उपचार सुरु आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार, हजारीबाग, रामगड, चतरा, लोहरदगा आणि रांची जिल्ह्यात गेल्या 12 दिवसांत 16 जणांचा हत्तींनी तुडवून मृत्यू केला आहे. झारखंडच्या (Jharkhand) लोहरदगा, हजारीबाग, गढवा, लातेहार, चाईबासा आणि आता रांची येथे हत्तींचा हैदोस सुरु आहे.

इटकी ब्लॉकमध्ये कळपापासून विभक्त झालेल्या हत्तीचा उपद्रव

मिळालेल्या माहितीनुसार, रांचीच्या इटकी ब्लॉकमध्ये हत्तीने 5 लोकांना चिरडले. यामध्ये सुखवीर ओराव, गोविंदा ओराव, पुनिया देवी आणि राखवा देवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी रुग्णावर रिम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. येथे हत्तीने 4 जणांना पायदळी तुडवून ठार केल्याची घटना घडल्यानंतर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे.

एसडीओने इटकीमध्ये कलम 144 लागू केले

विशेष म्हणजे, रांचीच्या (Ranchi) इटकी भागात हत्ती कळपापासून वेगळा फिरत असल्याची माहिती प्रशासनाला आधीच मिळाली होती. संभाव्य धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, रांची (सदर) एसडीओने पुढील आदेशापर्यंत इटकीमध्ये कलम-144 लागू केले. लोकांना घराबाहेर पडण्यास किंवा निर्जन भागात जाण्यास मनाई करण्यात आली होती. दरम्यान ही घटना घडली.

दुसरीकडे, घटनास्थळी लोकांची गर्दी प्रशासनासमोर आणखी आव्हाने निर्माण करु शकते. वनविभागाने लोकांना हत्तीजवळ न जाण्याचे आवाहन केले आहे. त्याला हाकलण्याचा प्रयत्न करु नका, ज्यामुळे हत्ती अधिक चिडून हानी पोहोचवू शकतो, असेही सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

डेनियलने 'हणजूण बीच'चा गळा घोटलाय, शिवोलीच्या आमदार गप्प का? लोबोंच्या मुलावर आरोप; RGPची Post Viral

'ऑपरेशन सिंदूर'नंतर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा पुन्हा सक्रिय, भारताविरुद्ध मोठ्या रॅलीचे आयोजन; गुप्तचर संस्थांची लाहोरवर करडी नजर

Neeraj Chopra: 'गोल्डन बॉय' बनला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुखांच्या हस्ते सन्मान VIDEO

SCROLL FOR NEXT