झारखंड काँग्रेसच्या 3 आमदारांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे. पाचही जणांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती हावडा ग्रामीणच्या एसपी स्वाती भंगालिया यांनी दिली.
झारखंड कॉंग्रेसच्या तीन आमदारांसह त्यांचा चालक आणि एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तीन आमदारांना काल रात्री हावडा येथे मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जात असताना ताब्यात घेण्यात आले. तेव्हापासून त्यांना सतत कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याचवेळी आज काँग्रेसने या आमदारांवर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. रांचीमधील खिजरी येथील आमदार राजेश कछाप, कोंगारी सिमडेगा येथील कोलेबिरा येथील आमदार नमन विक्सेल आणि आमदार इरफान अन्सारी हे तिघे आहेत.
हावडा ग्रामीणच्या एसपी स्वाती भंगालिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे काल संध्याकाळी या तीन आमदारांना हावडा येथून ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून वाहनातून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे.रोख रक्कम इतकी होती की मोजणीसाठी मोजणी यंत्र मागवावे लागले.
काँग्रेसच्या आमदारांना रोख रकमेसह पकडल्यानंतर त्यावरून राजकारणही सुरू झाले होते. त्यानंतर झारखंड काँग्रेसचे कार्याध्यक्ष बंधू तिर्की यांनी हे भाजपचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, हेमंत सोरेन सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपकडून अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात आणि इतर काही राज्यांमध्येही असे घडले आहे, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.