Court Dainik Gomantak
देश

पतीच्या इशाऱ्याला नकार देत पत्नीने सिक्रेट फोन कॉल करणे म्हणजे 'वैवाहिक क्रूरता'

कुटुंब म्हटलं की एकमेंकांवर असलेल्या विश्वासाची गोष्ट प्रचीत झाली पाहिजे. मात्र एका जोडप्याच्या बाबतीत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

कुटुंब म्हटलं की एकमेंकांवर असलेल्या विश्वासाची गोष्ट प्रचीत झाली पाहिजे. मात्र एका जोडप्याच्या बाबतीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Wife's secret phone call refusing husband's warning is marital cruelty Kerala High Court)

लाइव्हलॉने दिलेल्या वृत्तानुसार, पत्नीने आपल्या पतीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन दुसऱ्या पुरुषाला फोन कॉल करणे हे वैवाहिक जबाबदारीला न शोभणारे असल्याचे म्हणत केरळ उच्च न्यायालयाने एका निर्णयात जोडप्याला घटस्फोटाचा हुकूम मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत पतीने उच्च न्यायालयात अपील केली होती, त्यावर न्यायालयाने व्यभिचार आणि क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट घेण्याची पतीची मागणी फेटाळली.

तथापि, उच्च न्यायालयाने नमूद केले की, पत्नी आणि परक्या पुरुषामधील फोन कॉल्सचा पुरावा पत्नीच्या व्यभिचाराचा अंदाज लावण्यासाठी पुरेसा नाही. परंतु दोघांमध्ये चालू वैवाहिक कलह, ते तीन वेळा वेगळे आणि अनेक समुपदेशन सत्रांनंतर पुन्हा एकत्र आले या वस्तुस्थिती लक्षात घेता, पत्नीने तिच्या वागणुकीत अधिक सतर्क असायला हवे होते.

दरम्यान, या जोडप्यातील वैवाहिक कलह 2012 मध्ये सुरु झाला होता. पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. याआधीही पतीला आपल्या पत्नीबद्दल संशय आला होता की, आपल्या पत्नीचे लग्नाआधी ऑफिसमधील दुसऱ्या पुरुषाशी संबंध होते जे नंतरही सुरुच तसेच सुरु राहीले.

तथापि, पत्नी आणि तिसऱ्या पुरुषामधील फोन कॉल्सचा पुरावा पत्नीच्या व्यभिचाराचा अंदाज लावण्यासाठी पुरेसा नाही. त्यावर एका पक्षाने म्हटले आहे की, चालू वैवाहिकसंबंध आणि अनेक समुपदेशन सत्रांनंतर या दोन्ही गोष्टी वस्तुस्थिती म्हणून लक्षात घ्याव्यात, पत्नीने तिच्या वागणूकीत अधिक सतर्क असायला हवे होते.

त्यावर पतीने म्हटले की, एक वेळ अशी आली की, मी माझ्या पत्नी आणि तिसऱ्या व्यक्तीमधील प्रणयाचे फोन कॉल्स अनेकदा ऐकले होते. तीनं माझं न ऐकता परक्या पुरुषाबरोबर फोन कॉल्स तसेच सुरुच ठेवले.

यावरुन असे दिसून येते की, पतीने पत्नीला दुसऱ्या व्यक्तीबरोबर सुरु असलेल्या टेलिफोन संभाषणाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर आणि पतीला असे फोन कॉल करणे आवडत नाही हे लक्षात आल्यानंतरही, तसेच कॉल चालू ठेवणे योग्य नाही. दरम्यान हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की, पुराव्यांदरम्यान पत्नीने असा दावा केला की, मी फक्त काही दिवसचं त्या व्यक्तीला फोन करत असे.

तथापि, कागदोपत्री पुरावे सिद्ध झाले. पतीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन पत्नीने दुसर्‍या पुरुषासोबत वारंवार फोन करणे, तेही अवेळी हे वैवाहिक क्रौर्यच आहे,” असे न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांनी आपल्या निकालात नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

वीज कोसळून कर्नाटकच्या व्यक्तीचा गोव्यात मृत्यू? कोलवा येथे भाड्याच्या खोली बाहेर आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT