भारतीय तुरुंगात बंद असणाऱ्या पाकिस्तानी सुमायराची कहाणी वाचून व्हाल थक्क !

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राहिद अहमद (Sheikh Rahid Ahmed) यांनी गुरुवारी घोषणा केली की, 'आम्ही सुमायराला नागरिकत्व प्रमाणपत्र पाठवणार आहोत.'
Sumaira
SumairaDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय बंदी केंद्रात कैद असलेल्या सुमायरा या महिलेला पाकिस्तानने नागरिकत्व प्रमाणपत्र जारी केले आहे. त्यानंतरच ती लवकरच आपल्या मुलीसह पाकिस्तानात परत जावू शकणार आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राहिद अहमद (Sheikh Rahid Ahmed) यांनी गुरुवारी घोषणा केली की, 'आम्ही सुमायराला (Sumaira) नागरिकत्व प्रमाणपत्र पाठवणार आहोत.' (Sumaira A Woman lodged In An Indian Jail Has Been Issued A Citizenship Certificate By Pakistan)

दरम्यान, बेंगळुरुमधील (Bangalore) एका डिटेंशन सेंटरमध्ये गेल्या चार वर्षांपासून ती बंद आहे. पाकिस्तानतच्या नादरा विभागाकडून सुमायराच्या वंशजांची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. हे प्रमाणपत्र नवी दिल्लीतील (Delhi) पाकिस्तानी उच्चायुक्तांना पाठवण्यात आले आहे. यासोबतच प्रवासाची कागदपत्रेही त्यांना सुपूर्द करण्यात येणार आहेत. या पाकिस्तानी वंशाच्या महिलेला तिच्या मुलीसह भारतात कैद केल्याचा मुद्दा पाकिस्तानी सिनेटमध्ये उपस्थित करण्यात आला होता. पीएमएल-एनचे सिनेटर इरफान सिद्दीकी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

Sumaira
ब्लॅक लिस्ट अन् ग्रे लिस्ट म्हणजे काय?

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी नागरिकत्व असलेले एक कुटुंब कतारमध्ये राहत होते. तिथे पाकिस्तानी तरुणी सुमायराने भारतीय तरुणाशी लग्न केले. त्यानंतर त्याने सुमायराला व्हिसाशिवाय भारतात आणले. जिथे सुमायराला ताब्यात घेऊन तीन वर्षांच्या तुरुंगात पाठवण्यात आले. तिथे तिने एका मुलीला जन्म दिला.

Sumaira
पाकिस्तानने चिनी कंपनीला केले ब्लॅक लिस्ट, आर्थिक संबध बिघडणार?

तसेच, सुमायरा तुरुंगात गेल्यावर तिच्या पतीने तिच्याकडे पाठ फिरवली. चार वर्षे तुरुंगात राहिल्यानंतरही तिला कोणीच वाचवायला आले नाही. त्यामुळे बंगळुरुच्या लोकांनी तिच्या सुटकेसाठी एक लाख पाकिस्तानी रुपयांची देणगी जमा करुन तिची सुटका केली. विशेष म्हणजे बिघडलेल्या संबंधांच्या काळात भारत आणि पाकिस्तानच्या (Pakistan) तुरुंगातील कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरु झाली आहे. गुरुवारी 12 पाकिस्तानी कैद्यांना भारतातून पाकिस्तानात पाठवण्यात आले. भारतातील विविध तुरुंगातून या पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्यात आली. सुटका झालेल्या पाकिस्तानींमध्ये सहा मच्छिमार आणि सहा नागरिकांचा समावेश आहे. यापैकी एक पश्चिम बंगाल आणि जम्मूच्या तुरुंगात, तर सहा गुजरातच्या तुरुंगात आणि तीन अमृतसरच्या तुरुंगात बंद होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com