फेसबुक Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: पत्नीचे फेसबुक अकाउंट हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट, मारहाणीनंतर हाकलले घराबाहेर

Uttar Pradesh Crime: महिलेने पोलीस हेल्पलाइन 1090 वर तक्रार केली असता पतीने तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले

Pramod Yadav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेश येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पतीवर नाराज असलेल्या एका महिलेने पोलिसांत पतीविरोधात तक्रार दिली आहे.

पतीने पत्नीचे फेसबुक अकाउंट हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या, असा आरोप महिलेने केला आहे.

तक्रारदार महिला सासरच्या घरी गेली तेव्हा तिच्या खोलीला कुलूप होते, तिने पतीकडून चावी मागितली असता त्याने मोबाईल हिसकावून घेतला, त्यानंतर त्याने माझे फेसबुक अकाउंट हॅक केले आणि अनेक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या, असा आरोप महिलेने केला आहे.

महिलेने पोलीस हेल्पलाइन 1090 वर तक्रार केली असता पतीने तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा आरोप करत तिने पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

महिला नुकतीच सासरच्या घरी पोहोचली आणि तिने पतीकडे खोलीची चावी मागितली, तेव्हा तो रागाने तिला मारहाण करू लागला आणि मोबाईल हिसकावून घेतला तसेच गळ्याची चेन हिसकावून घेतली.

महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर तिच्या पतीला ताब्यात घेण्यात आले आणि चौकशी नंतर सोडून देण्यात आले. या घटनेपूर्वी तिच्या पतीने तिचे फेसबुक अकाउंट हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोपही महिलेने केला आहे. तक्रार केल्यावर पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

SCROLL FOR NEXT