Karva Chauth  Dainik Gomantak
देश

झिंगाट नवऱ्यासाठी बायकोला व्हाव लागलं दुर्गा

उत्तर प्रदेशातील एका महिलेने करवा चौथच्या दिवशी अजब प्रकारे केली आपल्या पतीची पुजा

दैनिक गोमन्तक

आज महिलांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे करवा चौथ (Karva Chauth) आहे. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात, त्यांची पुजा करतात. आपल्या पतीसाठी विविध प्रकारचे जेवण तयार करतात. नटतात- थटतात आणि साज श्रृंगार करून चंद्राची पुजा करतात. पण उत्तर प्रदेशातील (UP) इटावामधून एक अनोखीच बातमी समोर आली आहे. करवा चौथच्या दिवशी पत्नीने अजब प्रकारे आपल्या पतीची पुजा केली.

उत्तर प्रदेशातील इटावा येथे करवा चौथच्या एक दिवस आधी एका पत्नीने आपल्या पतीला सार्वजनिक ठीकाणी दोरीने बांधून त्याची चांगलीच पुजा केली आहे. मिळालेल्या महितीनुसार पती नशेच्या अवस्थेत असतांना त्याला पत्नीने जबर मारहाण केली.

हे प्रकरण इटावा जिल्ह्यातील महेवा मार्केटमध्ये घडले आहे, जिथे दारूच्या नशेत एक तरुण रसगुल्ल्याच्या दुकानासमोर उभा होता. त्यानंतर पत्नीने येऊन पतीचा हात दोरीने बांधला आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेने आपल्या पतीला मारहाण केल्याचे पाहून घटनास्थळी घबराट पसरली आणि त्या ठिकाणी लोकांचा जमाव जमला. गर्दी पाहून महिलेने आपल्या पतीला फरफटत घरात नेले.

शनिवारी सकाळी पत्नीने पतीला करवा चौथच्या पूजेसाठी वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते. तो पैसे घेवून बाजारत गेला तर कर मात्र बराच वेळ घरी न आल्याने पत्नीला काळजी वाटायला लागली. आपला पती घरी न पोहोचल्याने पत्नी त्याला शोधत बाजारात पोहोचली. तेथे तिने पतीला मद्यधुंद अवस्थेत पाहिले. आणि तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो राग एवढा प्रचंड होता की तिने आपल्या पतीला बाजारात मारहाण करायला सुरवात केली. पतीला मद्यधुंद अवस्थेत पाहून महिलेचा राग अनावर झाला आणि तिने दारूच्या नशेत असलेल्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, ही बाब अद्या स्थानिकप बकेवार पोलिसांच्या निदर्शनास आली नाही. एसओने या घटनेची माहिती देणे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT