Raipur NewlyWeds Death Dainik Gomantak
देश

Raipur NewlyWeds Death: लग्नाच्या रिसेप्शनदिवशी पत्नीची धारदार शस्त्राने हत्या, पतीचाही मृत्यू

Akshay Nirmale

Raipur NewlyWeds Death: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन दिवसांपुर्वीच प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याचे मृतदेह मंगळवारी रात्री आढळून आले. दोघांचेही मृतदेह घरातील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात सापडले. नववधूच्या छातीवर वार केले असून वराच्या मानेवरही मोठी जखम आहे.

दोघांमध्ये पूर्वी झालेल्या वादातून आधी पतीने पत्नीवर हल्ला केला, त्यानंतर मुलीनेही त्याच्यावर हल्ला केला असावा आणि दोघांचा मृत्यू झाला असावा, असे मानले जात आहे. पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

हे प्रकरण रायपूरच्या संतोषी नगर भागाला लागून असलेल्या ब्रिज नगरचे आहे. येथे राहणारा 24 वर्षीय अस्लमचा विवाह राजातालाब परिसरात राहणाऱ्या कहक्शान बानोसोबत 19 फेब्रुवारीला झाला होता. ब्रिज नगर येथील अस्लमच्या घरातून दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.

रायपूर शहरातील शास्त्री बाजार येथील सीरत मैदानात या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीची जय्यत तयारी करण्यात आली होती. पाहुण्यांसाठी मंडप सजला होता. आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र मेजवानीच्या आधीच या कुटुंबावर हे संकट कोसळले आणि आनंदी वातावरणाचे रूपांतर क्षणात दु:खात झाले.

पोलिस अधिकारी राजेश चौधरी यांच्या माहितीनुसार, दोघांनी खोलीला आतून कुलूप लावले होते. खोलीत फक्त अस्लम आणि काहक्शान उपस्थित होते. दोघेही रिसेप्शनच्या तयारीत होते. तेवढ्यात किंचाळण्याचा आवाज आला. घरी उपस्थित असलमच्या आईने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.

मात्र दरवाजा आतून बंद असल्याने ती उघडू शकली नाही. यानंतर नवीन सुनेचा आरडाओरडा ऐकून आईने खिडकीतून डोकावले असता मुलगा खाली पडलेला आणि सुनेचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. संपूर्ण खोली रक्ताने माखलेली होती.

प्राथमिक तपासात घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर एकमेकांवर हल्ला करण्याची परिस्थिती निर्माण झाली असावी, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या पोलिसांनी अस्लमचे घर सील केले आहे.

दोघांचेही मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. असलम हा मेकॅनिक म्हणून काम करत असे. तर काहक्शानचे वडील ड्रायव्हर आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT