Vrindavan Chandrodya Temple: 'बुर्ज खलिफा'लाही मागे टाकणार भारतातील 'हे' मंदिर

वृंदावनमध्ये सुरू आहे उभारणी; 2024 मध्ये पूर्ण होणार
Vrindavan Chandrodya Temple
Vrindavan Chandrodya TempleDainik Gomantak
Published on
Updated on

Vrindavan Chandrodya Temple: उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये बांधले जाणारे वृंदावन चंद्रोदय मंदिर 2024 मध्ये बांधून तयार होणार आहे. हे जगातील सर्वात उंच मंदिर असणार आहे. अशा स्थितीत वृंदावनाच्या दृष्टीने हे आकर्षणाचे महत्त्वाचे धार्मिक केंद्र मानले जाते. त्याचे काम जोरात सुरू आहे.

चंद्रोदय मंदिराच्या पायाची खोली जगातील सर्वात उंच इमारतीपेक्षा म्हणजे दुबईच्या बुर्ज खलिफा या जगातील सर्वाधिक उंचीच्या इमारतीपेक्षाही जास्त असणार आहे, हेच त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मानले जाते. या मंदिराची भव्यता अनोखी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Vrindavan Chandrodya Temple
Gurugram Women: महिलेने मुलासह स्वतःला 3 वर्षे घरात कोंडून घेतले, पतीलाही प्रवेश नाही; घरात कचऱ्याचा ढीग

2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिर तयार होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. 2024 मध्येच चंद्रोदय मंदिर पुर्ण होणार असून ते भाविकांसाठी खुले होऊ शकते, असे मानले जात आहे.

या मंदिराची पायाभरणी देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या कार्यकाळात केली होती.

मंदिराच्या उभारणीवर किती खर्च होतोय?

या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च आला आहे. वृंदावनाचे हे चंद्रोदय मंदिर पिरॅमिडच्या आकारात बांधले जात आहे. या मंदिराचे पीआरओ अभिषेक मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हे मंदिर जगात सर्वात उंच असणार आहे.

हे मंदिर 70 मजली असणार आहे. मंदिराची खोली 55 मीटर आहे. जी बुर्ज खलिफा या इमारतीच्या पायापेक्षा 5 मीटर जास्त आहे. 8 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंपदेखील या मंदिराला हानी पोहोचवू शकणार नाही.

चंद्रोदय मंदिर 170 किलोमीटर प्रतीतास वेगाच्या वादळाचा सामना करण्यास सक्षम असेल.

Vrindavan Chandrodya Temple
Waris Punjab De: पंजाबमध्ये अमृतपाल समर्थकांचा राडा! साथीदाराच्या सुटकेसाठी पोलिस ठाण्याला घेराव

तंत्रज्ञानाने सुसज्ज

इस्कॉन संस्थेद्वारे हे मंदिर बांधले जात आहे. मंदिराची लांबी, जंगल आणि थीम पार्क ही आकर्षणे असणार आहेत. थीम पार्कमध्ये राईड, अॅनिमेट्रॉनिक्स, लाइट, साउंड स्पेशल इफेक्ट्स अशा गोष्टी असतील. यासोबतच वज्र मंडळ परिक्रमेचे शोही होणार आहेत. लेझर लाईट शो, कृष्णाचे विविध मनोरंजन कार्यक्रम होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com