Wife having extra-marital affair cannot claim maintenance, says Karnataka High Court. Dainik Gomantak
देश

विवाहबाह्य संबंधात असणारी पत्नी पोटगीचा दावा करू शकत नाही: हायकोर्ट

"पत्नी पोटगीचा दावा करत असल्याने, तिला हे सिद्ध करावे लागेल की ती प्रामाणिक आहे. आणि जेव्हा ती स्वतः प्रामाणिक नसते तेव्हा ती तिच्या पतीकडे बोट दाखवू शकत नाही."

Ashutosh Masgaunde

Wife having extra-marital affair cannot claim maintenance, says Karnataka High Court:

कर्नाटक उच्च न्यायालयाने अलीकडेच एक निर्णय देताना म्हटले आहे की, पत्नी जर दुसऱ्या पुरुषासोबत व्यभिचारी संबंध ठेवत असेल तर ती पोटगीचा दावा करू शकत नाही.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार पत्नीला पोटगी नाकारण्याच्या आदेशाविरूद्ध महिलेची पुनर्विचार याचिका फेटाळताना न्यायमूर्ती राजेंद्र बदामीकर यांनी हे निरीक्षण केले.

न्यायालयाने म्हटले आहे की, पुराव्यांवरून स्पष्टपणे सिद्ध झाले की याचिकाकर्ता-पत्नी तिच्या पतीशी "प्रामाणिक" नव्हती आणि तिचे तिच्या शेजाऱ्यासोबत "विवाहबाह्य संबंध" होते.

न्यायालयाने या आदेशात म्हटले आहे की, "जेव्हा पत्नी विवाहबाह्य संबंधात राहत असेल, तेव्हा पोटगीचा दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

पतीने आपल्या मेहुणीच्या मुलीशी ‘अवैध संबंध’ ठेवल्याचा पत्नीचा आरोप वादग्रस्त असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय, असे म्हटले की,"पत्नी पोटगीचा दावा करत असल्याने, तिला हे सिद्ध करावे लागेल की ती प्रामाणिक आहे. आणि जेव्हा ती स्वतः प्रामाणिक नसते तेव्हा ती तिच्या पतीकडे बोट दाखवू शकत नाही."

पत्नीने यापूर्वी कौटुंबिक न्यायालयात पोटीगीचा दावा केला होता. त्यानुसार तिला पोटगी मंजूर झाली होती.

मात्र पतीने दाखल केलेल्या अपिलावर अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दंडाधिकारी यांचा निर्णय बाजूला ठेवला. पतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, कौटुंबिक न्यायालयाने व्यभिचार तसेच क्रूरतेच्या कारणावरून लग्न आधीच रद्द केले आहे.

या आदेशाच्या विरोधात दाखल केलेल्या पुनरीक्षण याचिकेवर उच्च न्यायालयाने म्हटले की, दंडाधिकारी दाव्यातील कोणतीही बाब समजू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी यांत्रिक पद्धतीने पोटगी मंजूर केली.

पत्नी व्यभिचारी जीवन जगत असल्याचे लक्षात घेऊन सत्र न्यायाधीशांनी दिलेला निर्णय योग्यच होता असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सत्र न्यायाधीशांच्या आदेशात कोणताही विपर्यास न आढळल्याने न्यायालयाने ही याचिका पुन्हा फेटाळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT