Chattisgarh News Dainik Gomantak
देश

Chattisgarh News: सेक्सवरून नवरा बायकोमध्ये भांडण, नंतर घडलं हादरवणारं कांड

छत्तीसगडमध्ये नवरा-बायकोच्या वादावरुन घडला धक्कादायक प्रकार तुम्हीही वाचुन व्हाल थक्क

दैनिक गोमन्तक

Chattisgarh News: छत्तीसगडमधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीवर पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांमध्ये शारीरिक संबंधांवरून वाद झाला होता. या बातमीमुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.

दरम्यान, पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. पण नवऱ्याला ते मान्य नव्हते.त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर महिलेने विहिरीत उडी घेतली. पतीने महिलेला विहिरीतून बाहेर काढले आणि काही वेळातच तिची हत्या केली.असा आरोप त्या व्यक्तीवर लावण्यात आला आहे.

ही घटना छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील आहे. इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार , शंकर राम आणि त्यांची पत्नी आशाबाई यांनी 17 एप्रिलच्या रात्री दारू प्यायले आणि त्यानंतर दोघेही झोपी गेले. त्यानंतर शंकरने पत्नीला

शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पण आशाने असे करण्यास नकार दिला आणि दोघांमध्ये वाद झाला. दोघांमधील भांडण इतके वाढले की आशाने जवळच्या विहिरीत उडी मारली. शंकरनेही मागून विहिरीत उडी मारली आणि तिला बाहेर काढले.

शंकरने पत्नीला विहिरीतून बाहेर काढल्या नंतरही दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. शंकरने आशाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्यावर आहे. रिपोर्टनुसार, तो रात्रभर पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी आरोपी शंकरला ताब्यात घेतले. वृत्तानुसार या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती स्टेशन प्रभारी जगसे पंकरा यांनी दिली.

यापूर्वी याच वर्षी जानेवारीमध्ये छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात एका 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे पाच तुकडे करून ते पाण्याच्या टाकीत फेकले होते. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाला संशय होता की, आपल्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत. त्यामुळे त्याने पत्नीची हत्या केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT