Rajanikant Guru , Guru Pournima Dainik Gomantak
देश

Rajinikanth's Guru: हिमालयात गूढ गुहेत राहणारे, महादेवाचे अवतार मानले जाणारे 'रजनीकांत' यांचे अध्यात्मिक गुरु कोण आहेत?

Mahavatar Babaji Rajinikanth's spiritual guru: 'जेलर' नावाचा सुप्रसिद्ध सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर. या सिनेमात सुपरस्टार रजनीकांत काम करत होते. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यांनतर त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

Sameer Panditrao

Mahavatar Babaji:गुरु पौर्णिमा, ज्याला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात, हा एक महत्वाचा दिवस आहे जो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचा सन्मान करतो. या दिवशी, लोक त्यांच्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या ज्ञानासाठी आणि मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानतात.

आपल्याला प्रसिद्ध व्यक्तींचे गुरु कोण आहेत याची उत्सुकता असते आणि ती व्यक्ती जर फिल्म क्षेत्रातील असली तर आपली जाणून घेण्याची इच्छा आणखी तीव्र होते. या रहस्याचा शोध लागला 'जेलर' नावाचा सुप्रसिद्ध सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर. या सिनेमात सुपरस्टार रजनीकांत काम करत होते. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यांनतर त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पण रजनीकांत मात्र या घवघवीत यशानंतर मन:शांती मिळवण्यासाठी त्यांच्या गुरूंना भेटायला गेले.

या घटनेनंतर सगळा इतिहास उलगडला. गेल्या २४ वर्षांपासून त्यांचा हा अध्यात्मिक प्रवास सुरू आहे. १९९९ साली 'पडैयप्पा' सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर रजनीकांत यांनी पहिल्यांदा हिमालयाची वाट धरली होती. त्यानंतर ते प्रत्येक सिनेमांनंतर आपल्या गुरूंचे दर्शन घेण्यासाठी हिमालयात जातात असे बोलले जाते.

कोण आहेत रजनीकांत यांचे गुरु?

रजनीकांत यांच्या आध्यात्मिक प्रवासामागे ज्यांचा प्रभाव आहे, ते म्हणजे महावतार बाबाजी. एक रहस्यमय, पण प्रभावशाली आध्यात्मिक गुरु अशी त्यांची ओळख आहे. ते हिमालयातील गुहेमध्ये राहतात आणि ते शिवाचे अवतार आहेत असे त्यांचे भक्त मानतात.

त्यांच्या जीवनाबद्दल आणि मरणाबद्दल कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही आहे. १८६१ ते १९३५ या काळातील त्यांचे काही संदर्भ सापडतात. लाहिरी महाशय यांनी आणि त्यांच्या शिष्यगणांनी त्यांना महावतार बाबाजी असे नाव दिले. रजनीकांत यांना 'Autobiography of a Yogi' या परमहंस योगानंद लिखित पुस्तकाद्वारे बाबाजींबद्दल प्रथम माहिती मिळाली.

कोण आहेत बाबाजी?

बाबाजी हे परमहंस योगानंदांचे गुरु लाहिरी महाशय यांचे गुरु होते. बाबाजींच्या जीवनाचा इतिहास अजूनही गूढ आहे, आणि त्यांची माहिती फक्त काही व्यक्तींच्या अनुभवांवर आधारित आहे.योगानंद यांच्या पुस्तकानुसार, बाबाजी अमर आहेत, आणि हजारो वर्षांपासून हिमालयात वास्तव्य करत आहेत. बाबाजींचा जन्म इ.स. दुसऱ्या शतकात तामिळनाडूतील कुड्डलोर येथे झाला, आणि ते पुढे ऋषिकेशला गेले, असेही काहीजण सांगतात.

डुनागिरीतील गूढ गुहा

हिमालयातील अल्मोडा जिल्ह्यातील डुनागिरी या ठिकाणी त्यांच्या गुहेत बाबाजींचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. रजनीकांत या गुहेला गेल्या अनेक वर्षांपासून नियमित भेट देतात. स्वतः रजनीकांत यांनी एका मुलाखतीत याबाबत सांगितले होते. सुपरस्टार रजनीकांत डुनागिरीत जाऊन अध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतात. पैसा, प्रसिद्धी आणि यशाच्या पलीकडे आत्मशांती शोधणारा हा रजनीकांत यांचा प्रवास लोकांसाठी प्रेरणादायी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT