Covaxin Dainik Gomantak
देश

भारत बायोटेकला धक्का! WHO ने लसीच्या आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर घातली बंदी

'चांगली उत्पादन पद्धत अभाव' या नियमाचा भारत बायोटेकला बसला फटका

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : कोरोना काळात भारतासह संपुर्ण जगाला आधार देणाऱ्या भारत बायोटेकला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) धक्का दिला आहे. तसेच WHO ने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर बंदी घातली आहे. तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (जीएमपी) म्हणजेच चांगल्या उत्पादन पद्धतीच्या अभावामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे WHO चे म्हणणे आहे. कोवॅक्सीन ही भारतातील पहिली स्वदेशी कोरोना लस आहे. याचदरम्यान भारत बायोटेक कंपनीने एक दिवस आधीच घोषणा केली होती की, ते लसीचे उत्पादन कमी करणार आहेत, त्यानंतर WHO चा हा निर्णय आला आहे. (WHO suspends Covaxin supplies under UN procurement)

WHO ने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर बंदी घालताना, 2 एप्रिल रोजी एक निवेदन जारी केले. त्यानुसार, WHO ने म्हटले आहे की, लस घेणारे देश या लसीविरुद्ध योग्य कारवाई करू शकतात. कोवॅक्सीनवर बंदी घालण्याची घोषणा EUL तपासणीनंतर करण्यात येते. WHO च्या टीमने 14 मार्च ते 22 मार्च 2022 पर्यंत भारत बायोटेकच्या प्लांटची तपासणी केली होती. त्यादरम्यान चांगल्या उत्पादन पद्धतीच्या अभाव दिसून आला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान कोरोनाच्या काळात ३ नोव्हेंबर रोजी WHO ने कोवॅक्सीनच्या (Covaccine) आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. मात्र, या लसीमध्ये जीएमपीची कमतरता काय आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे WHO ने लसीच्या सुरक्षिततेवर आणि FKC वर कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही. भारत बायोटेकने एक निवेदन जारी करून सांगितले की, गेल्या एक वर्षात कंपनीने सार्वजनिक आरोग्याचा (Public health) विचार करून सातत्याने काम केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अजून अपग्रेडची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT