Monkeypox Dainik Gomantak
देश

देशात Monkeypox चे एकूण 4 रूग्ण, दिल्लीत आढळला आणखी एक रूग्ण

देशात मंकीपॉक्सच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडत आहे. दिल्लीत मंकीपॉक्सची पहिली केस समोर आली

दैनिक गोमन्तक

Monkeypox In India: देशात मंकीपॉक्सच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडत आहे. दिल्लीत मंकीपॉक्सची पहिली केस समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत राहणाऱ्या 31 वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. सध्या या व्यक्तीला दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी ताप आणि पुरळ अंगावर आले, त्यानंतर टेस्ट करण्यात आली. (Monkeypox Global Health Emergency)

संक्रमित व्यक्ती पूर्वी हिमाचल प्रदेशातून परतली आहे. मात्र, त्यांच्या परदेश प्रवासाची माहिती अद्याप समोर आली नाही. आत्तापर्यंत भारतात मंकीपॉक्सची चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी तीन केरळमधील आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की 70 हून अधिक देशांमध्ये मांकीपॉक्सचा प्रसार ही जागतिक आणीबाणी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आज दक्षिण - पूर्व आशिया क्षेत्रातील देशांना मांकीपॉक्स बाधीत रूग्णांवर पाळत ठेवणे आणि सार्वजनिक आरोग्य उपायांना बळकट करण्याचे आवाहन केले आहे, या आजाराला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे.

WHO च्या अहवालात असे म्हटले आहे की 1 जानेवारी 2022 पासून ते 22 जून 2022 पर्यंत एकूण 3413 मंकीपॉक्स प्रकरणांची पुष्टी झाली आहे आणि ही प्रकरणे 50 देशांमध्ये नोंदवली गेली आहेत. मंकीपॉक्समुळे झालेल्या एका मृत्यूची नोंद WHO ला करण्यात आली आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे युरोपियन प्रदेश (86%) आणि यूएस (11%) मधून नोंदवली गेली आहेत.

केंद्राने दिला होता सल्ला

या महिन्याच्या सुरुवातीला, केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरेशी मानवी संसाधने सुनिश्चित करण्यास, लॉजिस्टिक सपोर्टसह रुग्णालये ओळखण्यास, मंकीपॉक्सच्या कोणत्याही संशयित किंवा पुष्टी झालेल्या प्रकरणाचे व्यवस्थापन करण्यास सांगितले होते. 50 देशांमधून WHO कडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 22 जून या कालावधीत प्रयोगशाळांमध्ये मंकीपॉक्सचे 3,413 पुष्टी झालेले रुग्ण आढळले आहेत आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे युरोपियन प्रदेश आणि अमेरिका खंडातून आली आहेत, अशी माहिती केंद्राने राज्यांना दिली होती.

केरळमध्ये तीन प्रकरणे

यापूर्वी शुक्रवारी केरळमध्ये तिसरा मंकीपॉक्सचा रूग्ण आढळला होता. मलप्पुरम जिल्ह्यात संयुक्त अरब अमिरातीतील एका तरुणाला संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या तरुणाला विलगिकरणात ठेवून जिल्ह्यातील मांजरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील आणि देशातील ही तिसरी घटना आहे, पहिली केस 14 जुलै रोजी नोंदवली गेली होती. काही दिवसांनी दुबईहून आलेल्या आणखी एका माणसाची चाचणी केली असता त्यालाही संसर्ग झाल्याचे आढळून आले. राज्यातील सर्व 14 जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले असून राज्यातील चार विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष हेल्थ डेस्क उघडण्यात आले आहेत. याला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

SCROLL FOR NEXT