Pro-Khalistan leader Amritpal Singh Dainik Go
देश

Who Is Amritpal Singh: खलिस्तानचं स्वप्न पाहणारा कोण आहे अमृतपाल सिंग? वाचा सविस्तर

Manish Jadhav

Pro-Khalistan leader Amritpal Singh: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला शनिवारी पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमृतपालच्या आधी त्याच्या सहा समर्थकांना पोलिसांनी अटक केली होती. 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल याच्याबाबत यापूर्वीही पंजाबमध्ये गदारोळ झाला होता.

फेब्रुवारीमध्ये, बंदुका आणि तलवारी घेऊन त्याच्या समर्थकांची अजनाळा पोलिस स्टेशनबाहेर पोलिसांशी झटापट झाली. अमृतपाल सिंग याचा जवळचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेविरोधात शेकडो समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निदर्शने केली होती.

कोण आहे अमृतपाल आहे?

अमृतपाल सिंग 'वारिस हे पंजाब दे' चा प्रमुख आहेत. गेल्या वर्षी रस्ते अपघातात मरण पावलेल्या अभिनेता दीप सिद्धूने ही संघटना स्थापन केली. सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंग या संघटनेचा नेता झाला. प्रजासत्ताक दिनी शेतकरी (Farmer) आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या आरोपाखाली दीप सिद्धूचे नाव चर्चेत आले होते.

दुसरीकडे, अमृतपाल सिंगचा जन्म पंजाबमधील (Punjab) जल्लूपूर खेरा येथे झाला. अमृतपाल सिंग हा एक स्वयंघोषित प्रचारक आहे, जो स्वतःला शीख समुदायाचा प्रतिनिधी म्हणून घेतो. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या किरणदीप कौर या अनिवासी भारतीय महिलेशी त्याने काही काळापूर्वी लग्न केले.

भिंद्रनवालेला तो आदर्श मानतो

अमृतपाल स्वतःला स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक म्हणून घेतो. तरुणांना ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढू, असे आश्वासन त्याने दिले आहे. या घोषणेनंतर पंजाब आणि भारताच्या इतर भागात त्याच्या अनुयायांची संख्या वाढली.

अमृतपाल सिंग खलिस्तानी समर्थक जर्नेलसिंग भिंद्रनवाले याला आपला आदर्श मानतो. एका रिपोर्टनुसार, तो भिंद्रनवालेसारखे कपडेही परिधान करतो. इंदिरा गांधी सरकारच्या काळात ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये जर्नेलसिंग भिंद्रनवाले मारला गेला.

तसेच, अमृतपालने 10 वर्षे दुबईत आपल्या कुटुंबाच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम केले. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बाहेर पडल्याने तो प्रसिद्धीच्या झोतात आला.

गेल्या वर्षी, अमृतपालच्या समर्थकांनी जालंधरमधील मॉडेल टाऊन गुरुद्वाराची तोडफोड केली आणि खुर्च्या आणि सोफ्यांना आग लावली. ते शीख धर्माच्या शिकवणीच्या विरोधात असल्याचे समर्थकांनी सांगितले. याशिवाय, कपूरथला जिल्ह्यातील बिहारीपुरा गावात असलेल्या गुरुद्वाराचीही तोडफोड करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT