
Pro-Khalistan leader Amritpal Singh: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला पंजाबच्या जालंधर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.
यापूर्वी शनिवारी त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. 'वारीस पंजाब दे' चा प्रमुख अमृतपाल सिंग याच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत दावा केला होता की, पोलिस आमच्या मागावर आहेत. एका व्हिडिओमध्ये अमृतपाल एका वाहनात बसलेलाही दिसत आहे.
दरम्यान, आणखी एका समर्थकाने व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दावा करत आहे की, पोलीस आमच्या मागावर आहेत.
गेल्या महिन्यात, अमृतपाल आणि त्याचे समर्थक, तलवारी आणि पिस्तूल घेऊन अमृतसर शहराच्या बाहेरील अजनाळा पोलिस (Police) स्टेशनमध्ये घुसले होते. यादरम्यान अमृतपालच्या निकवर्तीयाला सोडवण्यासाठी त्यांची पोलिसांशी झडप झाली होती.
'वारिस पंजाब दे' ही कट्टरपंथीयांची संघटना आहे, ज्याची स्थापना दीप सिद्धूने केली होती, ज्याचा गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला.
दुसरीकडे, पंजाबमधील (Punjab) अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पंजाब पोलिसांनी ट्विट करुन लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
पंजाब पोलीस राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत आहेत. लोकांनी घाबरुन जाऊ नये आणि अफवा पसरवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
अमृतपाल सिंग, दुबईतील गुन्हेगारी आणि सामाजिक संबंध असलेला स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक, आपल्या मायदेशी परतल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला.
अमृतपाल सिंगकडे परवाना असलेली शस्त्रे आणि स्वतःची फौज आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, अमृतपाल हा अनेक वाद, अपहरण आणि धमक्यांमध्ये गुंतला आहे.
नुकतेच त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धमकी दिली होती. शहा यांची अवस्था माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखी होईल, असे तो म्हणाला होता.
अमृतपालची संघटना 'वारीस पंजाब दे' ही दीप सिद्धूने स्थापन केलेली कट्टरतावाद्यांची संघटना आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.