Viral Video Dainik Gomantak
देश

Watch: ‘किंगमेकर’ नितीश कुमार जेव्हा मोदींच्या पाया पडतात! व्हिडिओ व्हायरल

Viral Video: एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत भाषण झाल्यानंतर नितीश कुमार यांनी बसण्यासाठी जात असताना पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

Manish Jadhav

Viral Video: यंदाची लोकसभा निवडणूक अभूतपूर्व ठरली. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणारे नरेंद्र मोदी दुसरे ठरले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. दरम्यान, आज दिल्लीत NDA ची संसदीय बैठक पार पडली. ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांची एकमताने NDA च्या नेतेपदी निवड करण्यात आली. NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदींनी जोरदार भाषण केले. त्यांनी पुन्हा एकदा नवनियुक्त खासदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला.

याचदरम्यान, एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत भाषण झाल्यानंतर नितीश कुमार यांनी बसण्यासाठी जात असताना मोदींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. नितीश कुमार त्यांच्या पायाला हात लावण्यासाठी पुढे सरसावताच मोदींनी त्यांचे दोन्ही हात धरले आणि प्रेमाने हस्तांदोलन केले. काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहेत.

दुसरीकडे, 2014 आणि 2019 मध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. यंदाही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता. मात्र भारतीय मतदारांनी भाजपला केवळ 240 जागापर्यंतच पोहोचवले. यामुळेच भाजपवर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची वेळ आली. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ‘किंगमेकर’ ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

SCROLL FOR NEXT