West Bengal Dainik Gomantak
देश

West Bengal: वसतिगृहातील 10 विद्यार्थ्यांना विजेचा धक्का, 5 जणांची प्रकृती गंभीर

या घटनेत 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या (West Bengal) दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका वसतिगृहातील 10 विद्यार्थी विजेचा धक्का लागून जखमी झाले आहेत. 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना काकद्वीप सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहाच्या आत विद्युत तार तुटलेली होती. त्याकडे वसतिगृह प्रशासनाने लक्ष दिले नाही. तारेत करंट येत होता आणि सर्व विद्यार्थी त्याच्या कचाट्यात आले. विजेचा धक्का लागून 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याआधी यूपीतील देवरिया येथूनही असेच प्रकरण समोर आले होते. येथे दहावीच्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. मृताचे वडील यूपी पोलिसात उपनिरीक्षक असून बाराबंकीचे रहिवासी आहेत. ही घटना सलेमपूर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदपलिया गावात घडली. मृत अमित हा कोचिंगचा अभ्यास करून परतत असताना वाटेत हाय टेंशन लाइनच्या तुटलेल्या वायरच्या कचाट्यात आला. तारेत करंट येत होता. वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्यांना जीव गमवावा लागला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT