IPS officer allegedly called Khalistani in West Bengal Dainik Gomantak
देश

West Bengal: खलिस्तानी म्हणाल्याने भडकले IPS अधिकारी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IPS officer allegedly called Khalistani in West Bengal: व्हिडिओ शेअर करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Manish Jadhav

IPS officer allegedly called Khalistani in West Bengal: भाजप कार्यकर्त्यांनी शीख धर्मीय आयपीएस अधिकाऱ्याला खलिस्तानी संबोधल्याचं प्रकरण पश्चिम बंगालमध्ये समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः X वर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राज्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

कायदा आणि सुव्यवस्था मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल

दरम्यान, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले. खरे तर, संदेशखळी प्रकरणाने राज्यातील राजकारण आधीच तापले आहे. आता भाजप कार्यकर्ता आणि शीख आयपीएस यांच्यातील हा व्हिडिओ सत्ताधारी पक्षाला विरोधकांवर हल्लाबोल करण्याची नवी संधी देत ​​आहे. या घटनेचा निषेध करताना मुख्यमंत्री म्हणाल्या की, भाजपला (BJP) वाटते की पगडी घातलेला प्रत्येक व्यक्ती खलिस्तानी आहे.

शिखांचे बलिदान विसरता येणार नाही

व्हिडिओ शेअर करताना मुख्यमंत्री म्हणाल्या की, शीख बांधवांनी देशाच्या सन्मानासाठी काम केले आहे, हे आपण विसरु शकत नाही. शीख बंधू-भगिनींचे मन दुखावणाऱ्या या घटनेचा मी निषेध करते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये संदेशखळी प्रकरणाने जोर पकडला आहे.

येथे (संदेशखळी भागात) मोठ्या संख्येने महिलांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर जमीन हडप करुन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. यानंतर संपूर्ण परिसराचे पोलीस छावणीत रुपांतर झाले आहे. याप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले आहे. त्याचवेळी, भाजपने पोलीस आणि प्रशासनावर याप्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT