West Bengal Crime Dainik Gomantak
देश

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील 13 वर्षीय मुलीसोबत संतापजनक कृत्य

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे.मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Puja Bonkile

West Bengal Crime news murshidabad rape horror 13 years old girl killed read full story

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जे वाचून तुमचाही थरकाप उडणार आहे. अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार करण्यात आला आहे. तिचे स्तन कापले गेले आणि डोळे काढून फेकून दिले नंतर निर्घृण हत्या करून तिला पुरले गेले. ही घटना उघडकीस येताच कोर्टाच्या आदेशानंतर मुलीचा मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

हृदयाला हादरवणारी ही घटना मुर्शिदाबादच्या हरिहरपारा येथे घडली. येथे एक 13 वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. 27 जानेवारी रोजी गावातील मोहरीच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कोणत्या अवस्थेत होता.

डोळे काढले होते

मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की तिचे दोन्ही स्तन कापले गेले आहेत. डोळेही काढले. शरीरावर अनेक ठिकाणी दात चावल्याच्या खुणा होत्या. कुटुंबीयांनी मुलीवर बलात्कार आणि हत्येचा आरोप केला होता. पण पोलिसांनी कुटुंबीयांचे म्हणणे न ऐकता पंचनामा करून मृतदेह पुरला.

20 दिवसांनी मृतदेह बाहेर काढला

कुटूबीयांनी मुलीचे शवविच्छेदन करण्यास सांगितले मात्र पोलिसांनी त्यांचे काहीही न ऐकता तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांनी कोलकाता उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानंतर 20 दिवसांनी मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला

मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यापूर्वी घटनास्थळी पूर्ण पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कोलकाता एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT