Anubrata Mandal Dainik Gomantak
देश

TMC नेते अनुब्रता मंडल यांना 10 दिवसांची CBI कोठडी, प्राणी तस्करी प्रकरणी अटक

Cattle Smuggling Case: प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) टीएमसीचे बीरभूम जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांना 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

Cattle Smuggling Case: प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) टीएमसीचे बीरभूम जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांना 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे. सीबीआयने अनुब्रत मंडल यांना आज आसनसोल येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. सीबीआयने 14 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने 10 दिवसांची कोठडी दिली आहे. TMC नेत्याला प्राण्यांच्या तस्करीच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती.

दरम्यान, अनुब्रत मंडलला (Anubrata Mandal) न्यायालयात हजर करतानाही लोकांमध्ये संताप दिसून आला. कोर्टाजवळ जोडे दाखवत लोकांनी 'चोर, चोर'च्या घोषणा दिल्या. आज सकाळी सीबीआयची एक टीम टीएमसीचे (TMC) बीरभूम जिल्हाध्यक्ष मंडल यांच्या घरी पोहोचली. तासाभराच्या चौकशीनंतर सीबीआयने मंडल यांनी अटक करण्यात आली. केंद्रीय दलाच्या कर्मचार्‍यांसह आठ अधिका-यांचे CBI पथक सकाळी 10 च्या सुमारास मंडल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तपासाचा भाग म्हणून शोध मोहीम सुरु केली.

दोनदा समन्स पाठवले, सादर केले नाही

यापूर्वी, तृणमूल नेते अनुब्रत मंडल हे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत दोनदा केंद्रीय तपास यंत्रणेसमोर हजर झाले नव्हते. अनुब्रत मंडल यांना अटक केल्यानंतर सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, "प्राणी तस्करी घोटाळ्याच्या तपासात सहकार्य न केल्याबद्दल आम्ही त्यांना अटक केली आहे. या घोटाळ्यात मंडल यांचा थेट सहभाग असल्याचे आढळून आले आहे. मंडल यांची चौकशी करुन कायद्यानुसार आवश्यक कारवाई करु."

तृणमूल नेत्याच्या निकटवर्तीयांवरही छापे टाकण्यात आले

ते पुढे म्हणाले की, 'अनुब्रत मंडल यांना अटक करण्यापूर्वी सीबीआयने नोटीस बजावली होती. त्यांचे अंगरक्षक सहगल हुसैन यालाही केंद्रीय एजन्सीने अटक केली आहे. तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तृणमूल नेत्याच्या अनेक निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवरही छापे टाकले आहेत. मंडल यांची सीबीआयने यापूर्वी दोनदा चौकशी केली आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बनावट ग्राहक पाठवला, सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; मास्टरमाईंडला बेळगाव येथून अटक

BITS Pilani: ‘बिटस पिलानी’त फुड पॅकेटमध्ये सापडली सिगारेट! पार्सलची तपासणी सुरू; डिलिव्हरी कंपनीला सक्त इशारा

Rashi Bhavishya 14 September 2025: आर्थिक लाभाचे संकेत, कुटुंबात सौख्य; भावनिक तणाव टाळा

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT