West Bengal Dainik Gomantak
देश

पैगंबर विवाद: तोडफोडीनंतर भाजप कार्यालयाला आग, हावडामध्ये उडाली खळबळ

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करुन हल्लेखोरांनी आग लावली.

दैनिक गोमन्तक

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या दोन माजी नेत्यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याविरोधात पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात शुक्रवारी शेकडो आंदोलकांनी रस्ते अडवले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करुन हल्लेखोरांनी आग लावली. हावडा-खड़गपूर रेल्वे मार्गावरील दासनगर रेल्वे स्थानकाजवळही लोकांनी निदर्शने केली. (west bengal bjp office vandalised and torched in uluberia howrah over prophet muhammad remarks)

भाजप कार्यालयाची तोडफोड आणि आग

तसेच, पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धुलागढ, पांचाला आणि उलुबेरियामध्ये आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग 6 ची नाकेबंदी उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांशी झटापट झाली. वृत्तानुसार, उलुबेरियातील भाजपच्या कार्यालयाची तोडफोड करुन जाळण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने, शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भाजप कार्यालयात तोडफोड आणि आगीनंतर वस्तू विखुरल्याचे दिसून येतात.

पोलिसांनी लाठीचार्ज केला

“भाजपच्या दोन नेत्यांना आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तात्काळ अटक करण्यात यावी,” असे एका आंदोलकाने म्हटले आहे. धुलागड आणि पाचलामध्ये जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना (Police) लाठीमार करावा लागला, जिथे आंदोलकांनी प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली आणि जवळपास उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान केले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच, दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फुलेश्वर आणि चेंगेल स्थानकांदरम्यान दुपारी 1:22 वाजता आंदोलकांनी हावडा-खड़गपूर सेक्शनवरील ट्रॅक अडवले. बंगाल इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद याहिया म्हणाले की, संघटनेने भाजपच्या (BJP) दोन माजी नेत्यांच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यभरातील मशिदींमध्ये निदर्शने केली होती. ते पुढे म्हणाले की, रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रशासन मोकळे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT